महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑक्टोबर ।। अजित पवार यांना पक्ष चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे. मात्र अजित पवार यांना प्रत्येक ठिकाणी ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे’ असा मजकूर लिहावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरण हे फेब्रुवारी २०२४ पासून सुप्रीम कोर्टात प्रबंलित आहे. ज्यावेळेस निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं होतं. त्यावेळी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी नोटिस देण्यात आली, त्यानंतर त्या नोटिसला अजित पवार गटाने उत्तर देखील दिलं. तो मुख्य विषय अद्याप कोर्टात प्रबंलबित आहे. लोकांमध्ये चिन्हाबाबत संभ्रम आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना सुद्धा दुसरं चिन्ह देण्यात यावे. तसेच अर्ज शरद पवार गटाने मागील महिन्यात केला होता.
ज्यावेळी अजित पवार प्रचारात किंवा कोणत्या कार्यक्रमात बॅनर लावतील तेथे घड्याळ चिन्ह वापरत असतील तर त्यावेळी तेथे एक मजकूर लिहिला गेला पाहिजे. ऑडिओ-व्हिडिओ जाहिरात किंवा पत्रकातदेखील हा मजकूर लिहिला गेला पाहिजे. पक्ष आणि चिन्ह प्रकरण हे कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टाचा मुख्य निर्णय येऊपर्यंतच घड्याळ हे चिन्ह आमच्याकडे आहे. त्यावरून शरद पवार यांचे वकील सांघवी म्हणाले की, अजित पवार गटाकडून हा मजकूर फॉलो केला जात नाहीये.
सिंघवी यांनी दाखवलं की, अजित पवार यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आहे तेथे मजकूर वापरला गेला नाहीये. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात नेण्यात आलंय तेव्हा त्यांनी तो मजकूर लावला. मार्चमध्ये आलेल्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, अजित पवार यांच्याकडे लोकसभा आणि विधानसभेसाठी घड्याळ हे चिन्ह असेल. आणि शरद पवार यांच्याकडे तुतारी चिन्ह असेल. सुप्रीम कोर्टचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत हे चिन्ह असणार आहे.
भांडुपमध्येही राज ठाकरेंना धक्का
दरम्यान कोर्टाने सांगितलं की, आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालीय. त्यामुळे चिन्ह बदलाविषयी सुचना देता येणार नाहीये. परंतु ६ नोव्हेंबरला हे प्रकरण पुन्हा एकदा ऐकलं जाईल.