Gold Buying: जुने सोने विकून नवीन दागिने खरेदी केल्यास जाणून घ्या कसा आणि किती लागतो टॅक्स…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ नोव्हेंबर ।। आम्ही सर्व आमचे जुने दागिने विकतो आणि नवीन डिझाइन केलेले दागिने खरेदी करतो पण जुने दागिने विकून नवीन दागिने खरेदी केल्यास भांडवली नफा कर भरावा लागतो हे फार कमी लोकांना माहित आहे. दिवाळीपूर्वीच सोन्याच्या किंमतीने ऐंशी हजार पार मजल मारली ज्यामुळे सोने खरेदी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. परिणामी बहुतेक लोक घरातील जुने दागिने देऊन नवीन खरेदी करत आहेत. पण जुने दागिने देऊन नवीन दागिने खरेदी करण्याबाबत सर्वप्रथम आयकर नियम तुम्हाला माहिती असला पाहिजे.

नावीन दागिने घेण्यासाठी जुने दागिने तुमची जुनी मालमत्ता विक्री म्हणून पहिली जाते. अशा स्थितीत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२४ मध्ये भांडवली नफ्याशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती.

सोन्यांच्या दागिन्यांवर आयकर नियम
नवीन नियमांनुसार एखाद्या व्यक्तीने कोणतीही बिगर-आर्थिक मालमत्ता खरेदी केल्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळ विकली तर त्याला इंडेक्सेशनशिवाय १२.५ टक्के भांडवली नफा कर आकारला जाईल. त्याचवेळी, एखादी मालमत्ता दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत विकली तर त्यातुन होणारा नफा अल्पकालीन मानला काही आणि टॅक्स स्लॅबनुसार नफ्यावर आकारला जाणारा कर एकूण उत्पन्नात जोडला जाईल.

कर सवलतीचा दावा
मालमत्ता खरेदी करण्यासाठी विक्रीतून मिळालेली रक्कम वापरल्यास तुम्ही आयकर कपातीचा दावा करू शकता. आयकर कायद्याच्या कलम 54F अंतर्गत विक्रीतून मिळालेली रक्कम मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरली जाते तेव्हा तुम्ही आयकर सवलतीचा दावा करू शकता. पण नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी सोने किंवा इतर मौल्यवान धातू विकले जातात तेव्हा ती नवीन खरेदी मानली जाते आणि विक्रीतून मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर कर आकारला जातो.

उदाहरणार्थ, तुम्ही दोन वर्षांपूर्वी सोन्याची चेन विकत घेतली तर तुम्ही ती विकून ५०,००० रुपयांचा भांडवली नफा मिळवला तर भांडवली नफ्यावर तुम्हाला ६,२५० रुपये (१२.५ x ५०,०००/१००) भरावे लागतील. तसेच तुम्हाला ४% सेस (२५० रुपये) आकारला जाईल. अशाप्रकारे तुम्हाला एकूण ६,५०० रुपये कर भरावा लागेल. नवीन नियम २३ जुलै रोजी फायनान्स बिल २०२४ लागू झाल्यानंतर लागू झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *