Maharashtra Weather News : राज्यात नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ नोव्हेंबर ।। मुंबईत पुन्हा एकदा उष्णता वाढली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरात पुन्हा एकदा लाहीलाही वाढली आहे. मुंबईतील तापमानाची नोंद 34 ते 35 डिग्री आहे. राज्यातील काही ग्रामीण भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आधी पाऊस नंतर ढगाळ वातावरणामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. 12 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पावसाची रिपरिप देखील होत आहे.

कोकणात मात्र आठवडाभरापासून पाऊस नुसता धो-धो कोसळत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. या भागात सोसाट्याचा वारा सुटेल, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भाऊबीजेच्या दिवशी कसं असं वातावरण? आज राज्यात मिश्र वातावरण राहील मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात कोरडे आभाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाचा अंदाज ठरविण्यात आला आहे.

भाऊबीजेच्या दिवशी कसं असं वातावरण?
आज राज्यात मिश्र वातावरण राहील मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात कोरडे आभाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाचा अंदाज ठरविण्यात आला आहे.

थंडी वाढणार
राज्यात हिवाळ्यात सुरुवात लवकरच होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सियस तर किमान तापमान 22 अंश सेल्सियस इतकं नोंदव्यात आला आहे. काही दिवसांमध्ये राज्यात तापमान घसरले आणि थंडीचे प्रमाण देखील वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे. लवकरच महाराष्ट्रात गुलाबी झालर अनुभवता येणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *