Air quality : पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली तर मुंबईची स्थितीही खराबच, पहा आजचा हवामानाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ नोव्हेंबर ।। दिवाळीनंतर पुणे आणि मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील हवा सर्वात जास्त खराब झाली. पुण्यातील हडपसर परिसरातील हवा धोकादायक पातळीवर पोहोचली असून, श्वसनास त्रास होण्याची शक्यता आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पुणे आणि मुंबई या दोन्ही शहराची हवा खराब झाली आहे. हवेची पातळी खालावल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

फटक्यांमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण झाले आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. पुण्यातील अनेक भागात हवा धोकादायक पातळीवर आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक ११५ वर पोहचलाय. फटाक्यांच्या आतषबाजीने हवेची पातळी खालावली आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक पुढीलप्रमाणे :

शिवाजीनगर – २५४

भूमकरनगर – १७४

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – २९८

कर्वे रस्ता – २०९

हडपसर – २८१

लोहगाव येथील म्हाडा कॉलनी – १५४

पंचवटी – १९६

पुणे, सातारा नगर बीड धाराशिव लातूर नांदेड येथील ७ जिल्ह्यात फक्त ढगाळ वातावरण तर उर्वरित २९ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.

सध्या ऑक्टोबर हिट जाणवते पण लवकरच थंडीची चाहूल –

सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान सरासरी इतके म्हणजे ३३ डिग्री से. ग्रेड च्या आसपास आहे तर पहाटेचे किमान तापमान मात्र भाग बदलत सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्री से. ग्रेड ने अधिक म्हणजे २२ डिग्री से. ग्रेड च्या आसपास आहे. त्यामुळे अजुन ऑक्टोबर हिटचा परिणाम टिकून आहे. मंगळवार दि. ५ नोव्हेंबर पासून निरभ्र आकाशासहित संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीला सुरवात होवू शकते, असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *