नाभीला तूप लावल्याचे हे 5 आरोग्यदायी फायदे ; जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ नोव्हेंबर ।। देसी तुपात व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-डी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म उत्तम आरोग्यासोबतच सुंदर त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. आंघोळीपूर्वी दररोज देसी तूप नाभीत लावल्यास अनेक समस्या दूर होतात, असं तज्ज्ञ सांगतात. त्यातून कुठले फायदे होतात पाहूयात. नाभीवर तूप लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करते. त्यामुळे त्वचा सतत चमकत राहते.

आयुर्वेदानुसार नाभी हे पचनाचे स्थान मानले जाते. या ठिकाणी तूप लावल्याने पाचक एंझाइम सक्रिय होतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी देशी तुपाचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी नाभीत तुपाचे २-३ थेंब टाकून हलक्या हाताने मसाज करा. नाभीत तूप लावल्याने पचनक्रिया सुधारते आणि व्यक्तीच्या बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

सांधेदुखीचा त्रास होत असेल तर नाभीत तूप लावल्यास आराम मिळेल. सर्वप्रथम नाभीमध्ये तुपाचे काही थेंब टाकून नाभीभोवती मसाज करा. हा उपाय केल्याने सांधेदुखी दूर होईल आणि सूज दूर होईल.आयुर्वेदानुसार नाभीवर तूप लावल्याने वात दोष दूर होतो. आम्ही तुम्हाला सांगतो, जेव्हा वात असंतुलित असतो तेव्हा व्यक्तीला चिंता, अस्वस्थता आणि पचनसंस्थेमध्ये विकार होऊ लागतात. पण तूप माणसाला वात ऊर्जा स्थिर करून शांतता आणि स्थिरता अनुभवण्यास मदत करू शकते.

(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *