दूषित पाण्याने पसरणाऱ्या आजारांमुळं राज्यात 15 मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ नोव्हेंबर ।। राज्यात गारवा वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्याचबरोबर प्रदूषणदेखील वाढले आहे. प्रदूषणामुळंदेखील आजारांतही वाढ होताना दिसत आहे. सर्दी-खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आरोग्य विभागाकडून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जलजन्य आजारांमुळं (Waterborne Diseases) राज्यात गेल्या 11 महिन्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत हे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळं जलजन्य आजारांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे अद्याप आरोग्य विभागाला शक्य झाले नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जलजन्य आजारा म्हणून दुषित पाण्यामुळं होणारे आजार.

यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, विषमज्वर यासारख्या आजारांमुळे राज्यात १५ मृत्यू झाले आहेत. राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या कमी की दिसत असली तरीही हा चिंतेचा विषय आहे. गॅस्ट्रो, कॉलरामुळे प्रत्येकी चार, अतिसारामुळे सहा, काविळमुळे एकाला प्राण गमवावे लागले आहेत. या आजाराच्या रुग्णांची संख्या ३५६४ इतकी होती. काविळची लागण सर्वाधिक म्हणजे १२५७ रुग्णांना झाली तर कॉलरामुळे १०२८ जणांन त्रास झाला. ६५९ जणांना गॅस्ट्रो झाल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीमध्ये दिसून आले आहे.

२०२१ मध्ये या आजारामुळे त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या १६२२ तर २०२२ मध्ये ही संख्या ३७९२ इतकी होती. २०२३ मध्ये १२१३ जणांना जलजन्य आजारांमुळे प्रकृतीच्या तक्रारींना तोंड द्यावे लागले. मागील काही वर्षांच्या तुलनेत जलजन्य आजारांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, ही संख्या आता ३५६४ इतकी झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. राज्यात लेप्टोस्पायरोसिस व स्क्रबटायफसची लागण ९१७ जणांना झाली असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लेप्टोच्या ९०० तर स्क्रबटायफसची लागण सतरा रुग्णांना झाली.

जलजन्य आजारांमुळं पोटांचे विकार बळवतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर एक ते दोन दिवसात खूप जुलाब सुरु होतात. पोटात खूप दुखतं, कळा येतात. तीन ते चार दिवसात प्रकर्षाने ताप येतो. त्यामुळं शक्यतो पाणी गाळून प्यावे. तसंच, आजार कळताच रुग्णालयात जावून त्वरित उपचार घ्यावे. साधारणतः पावसाळ्यात जलजन्य आजारांची साथ वाढते. मात्र, आता पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला तरी जलजन्य आजारांना रोखता आले नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *