महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ डिसेंबर ।। टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येत असून पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा उपस्थित नव्हता. मात्र दुसर्या सामन्यात तो सहभागी होणार असून टीम इंडियाची कमान देखील तो सांभालणार आहे.
पिंक टेस्टपूर्वी तयारीसाठी टीम इंडिया कॅनबेरामध्ये प्राईम मिनिस्टर X1 विरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळली. यावेळी टीम इंडियाला फलंदाजी कॉम्बिनेशन ठरवण्यासाठी फक्त 1 दिवसाचा वेळ मिळाला. यामुळे टीमच्या प्लेइंग-11 चा प्रश्नही सोडवावा लागला. अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक मोठा निर्णय घेतला असून प्लेइंग 11 हिटमॅनने मोठे संकेत दिलेत.
रोहित शर्माचा मोठा निर्णय
रोहित शर्माच्या जागी केएल राहुलने पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंग केली होती. मात्र आता रोहितच्या कमबॅकनंतर राहुल कुठे खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर सराव सामन्यात मिळालंय.
या सामन्यात केएल राहुलने यशस्वी जयस्वाल सोबत डावाची सुरुवात केली. म्हणजेच ॲडलेडमध्येही असंच दृश्य पाहायला मिळण्याची शक्यता आहे. केएल राहुलने पर्थ टेस्टमध्ये पहिल्या डावात २६ रन्स आणि दुसऱ्या डावात ७७ रन्स केले होते. या सामन्यात तो चांगल्या कंट्रोलमध्ये दिसून येत होता. त्यामुळे रोहित ॲडलेड टेस्टमध्ये त्याच्या ओपनिंगच्या जागेचा त्याग करू शकतो.
6 वर्षांनंतर घडणार ही गोष्ट
रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात ओपनर म्हणून केली नव्हती. तो टीम इंडियासाठी फक्त मिडल ऑर्डर किंवा लोअर ऑर्डरमध्ये खेळत होता. 2019 पासून त्याने टेस्टमध्ये ओपनिंगला सुरुवात केली. तेव्हापासून तो टेस्टमध्ये सातत्याने ओपनिंग करतोय.
रोहितने 2018 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा टेस्ट सामना ओपनरशिवाय खेळला होता. त्यानंतर 2018 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित मेलबर्नमध्ये सहाव्या क्रमांकावर खेळला होता. त्यामुळे आता तब्बल 6 वर्षांनंतर तो पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात ओपनिंग करताना दिसणार आहे.