महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ डिसेंबर ।। कात्रजच्या मुख्य चौकातील उड्डाणपुलाचे सेगमेंटल लाँचिंगचे काम करायचे असल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. हे काम 3 डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. कात्रज चौकामध्ये उड्डाणपुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लाँचिंगचे काम करायचे असल्यामुळे या रस्त्यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.
असा केला आहे बदल…
साताराकडून जुना कात्रज बोगद्यामार्गे येणार्या वाहनांना शिंदेवाडी पूल येथे प्रवेश बंद राहणार आहे.
सातार्याकडून नवीन बोगद्यामार्गे कात्रज चौकाकडे येणार्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद राहील.
मुंबईकडून वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणार्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद राहणार आहे.
सोलापूरकडून हडपसर मंतरवाडीमार्गे कात्रज चौकाकडे येणार्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे प्रवेश बंद राहील.
सासवडकडून मंतरवाडीमार्गे कात्रज चौकाकडे येणार्या वाहनांना खडी मशीन चौक पुढे प्रवेश बंद राहील.
बोपदेव घाटाकडून कात्रज चौकाकडे येणार्या वाहनांना खडीमशीन चौक पुढे प्रवेश बंद राहणार आहे.
मार्केट यार्ड, गंगाधाम, बिबवेवाडीमार्गे कात्रज चौकाकडे जाणार्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे प्रवेश बंद राहील.
स्वारगेटकडून कात्रजमार्गे सातार्याकडे जाणार्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे, तर मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री दहा ते पहाटे चारपर्यंत प्रवेश चालू राहील. त्यांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश बंद राहणार आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूरवरून येणार्या एसटीला सिंहगड रस्त्याने प्रवेश
कात्रज चौकात उड्डाणपूल मंगळवारी (दि. 03) रात्री 12.00 पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे एसटीच्या गाड्यांना पुढील आदेश येईपर्यंत कात्रज चौकात बंदी असणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरवरून कात्रज चौकात येणार्या एसटी बसला बंदी असणार आहे. या बस नव्या बोगद्यामार्गे नवले पूल, पासलकर चौक पूलमार्गे सिंहगड रोडने स्वारगेटसाठी शहरात प्रवेश करतील, असे एसटीच्या पुणे विभागाचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी सांगितले.