महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – ७ ऑगस्ट – मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोविडच्या रुग्णांसाठी मोठ्या मैदानांवर जम्बो हॉस्पिटल्स उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठी तीन जागांची निश्चिती करण्यात आली आहे.
यापैकी दोन हॉस्पिटल्सचं काम सुरू झालं असून तिसऱ्याचं काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत या हॉस्पिटल्ससाठी 25 ऑगस्टची डेडलाईन दिली होती.
पुणे शहर आणि परिसराची कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. दिवसभराची बाधितांची संख्या आता मुंबईच्याही पुढे जाते आहे. पण वाढणाऱ्या संख्येच्या तुलनेमध्ये आवश्यक बेड्स आणि व्हेटिंलेटरची कमतरता पुण्यात भासते आहे. त्यामुळे मुंबईत जशी उभारली तशी तीन जम्बो हॉस्पिटल्स युद्धपातळीवर उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
यातल्या २ हॉस्पिटल्सचं काम सुरू झालं असून 19 ऑगस्टपर्यंत ती पूर्णपणे कार्यरत होतील असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.