महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – ७ ऑगस्ट – सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले, ‘जी स्वीट’ आणि ‘गुगल’ क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. ‘जी स्वीट फॉर एज्युकेशन’, ‘गूगल क्लासरूम’, ‘गूगल मीट’ यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.
ठळक बाबी
• शिक्षणासाठी जी स्वीट : जीमेल, डॉक्स आणि ड्राइव्ह तसेच क्लासरूमसह परिचित संप्रेषण आणि सहयोग साधनांचा विनामूल्य संच. हे कोठेही, केव्हाही आणि डिव्हाइसच्या श्रेणीवर शिकण्यास सक्षम करते.
• ‘गूगल क्लासरूम’ : जी स्वीट फॉर एज्युकेशन मधील एक सोपं पण शक्तिशाली साधन, जे शिक्षकांना सहजपणे असाइनमेंट तयार करण्यास, पुनरावलोकन करण्यास आणि आयोजित करण्यात मदत करते, तसेच वर्गात किंवा दूरस्थ शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यास मदत करते.
• ‘गूगल फॉर्म’ : एक सोपा प्रश्न आणि प्रतिसाद साधन जे शिक्षकांना क्विझ आणि चाचण्या लवकर तयार करण्यासाठी प्रश्न भरण्यास किंवा आयात करण्यास अनुमती देते.
• असाइनमेंट्स : एक असे साधन जे शिक्षकांना लवकर आणि सुरक्षितपणे तयार करण्यास, विश्लेषण करण्यास आणि ग्रेड कोर्सवर्क करण्यास आणि विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अधिक लवचिकता प्रदान करण्यास अनुमती देते.