बाबा सिद्दीकींच्या अगोदर सलमान खानच होता हिटलिस्टवर, आरोपीचा ‘तो’ खळबळजनक खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ डिसेंबर ।। बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे सलमान मोठ्या संपत्तीचा मालक आहे. सलमानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून शहनाज गिल हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. सलमान खानला बॉलिवूड दबंग खान देखील म्हटले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत.

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. फक्त हेच नाही तर सलमान खानच्या घरावर बिश्नोई टोळीकडून गोळीबार देखील करण्यात आला. सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्यावर बिश्नोईच्या तीन शूटरकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर बिश्नोई टोळीकडून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आलीये.

सलमान खानच्या शूटिंग लोकेशनवर संशयित, पोलिसांनी घेतले ताब्यात, थेट म्हणाला, मी बिश्नोईला…
बाबा सिद्दीकी प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आता मोठा आणि धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. आरोपीने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या अगोदर सलमान खान हाच त्यांच्या निशाण्यावर होता. मात्र, कडक सुरक्षा असल्याने त्यांना सलमान खान याच्यावर गोळीबार करता आला नाही. त्यांनी अनेकवेळा सलमान खानवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलमान खानच्या आजूबाजुला जास्त सुरक्षा असल्याने ते शक्य झाले नाही.

आरोपीचे बोलणे ऐकून सलमान खानच्या चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी मोठे खुलासे करताना दिसत आहेत. बाबा सिद्दीकींच्या हत्येची माहिती मिळताच सलमान खान याने रूग्णालयात धाव घेतली होती. सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. कडक सुरक्षेत सलमान आपल्या चित्रपटांचे शूटिंग करत आहे. सततच्या धमक्यांमुळे त्याची सुरक्षा वाढवण्यात आलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *