महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ डिसेंबर ।। विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्थात लाडक्या बहिणींनी मतदान केल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. आत्तापर्यंत या योजनेतून २.५ कोटी महिलांना लाभ मिळाला आहे.
राज्यातील २.६ कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. पैकी २.३ कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे मिळाले आहेत. तर १६ लाख महिलांच्या खात्यासोबत आधार लिंक नाही, त्यामुळे लाभ पोहचला नाही. विधानसभा निवडणुकीआधी १७ हजार कोटी रूपये सरकारने महिलांच्या खात्यावर जमा केले.
लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीने आतापर्यंत ६ महिन्यांत सुमारे १७ हजार कोटी रुपये वितरित केल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. महायुती सरकारने २०२४ – २०२५ देखील १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली.