नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ‘हे’ आहेत पाच दमदार स्मार्टफोन,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई -दि.९ लॉकडाऊन आणि कोरोना काळात तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक पर्याय आहेत. मात्र या काळात अनेक जण ‘हातचे राखून’ खर्च करत असून तुम्हीही खूप महागडा स्मार्टफोन न घेता कमी बजेटमध्ये दमदार स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर हे ‘बेस्ट स्मार्टफोन’ बाजारात उपलब्ध आहेत.

@. सॅमसंग गॅलेक्सी एम10
Samsung Galaxy M10 आता केवळ 10 हजार रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. 6.20 इंची डिस्प्ले, Exynos 7870 प्रोसेसर सह 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज व 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज अशा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 2 जीबी रॅमच्या फोनची किंमत 6 हजार 999 आणि 3 जीबी रॅमच्या फोनची किंमत 8 हजार 690 रुपये आहे.

@. रेडमी नोट 7
शाओमी कंपनीचा हा आणखी एक बजेट फोन असून यात 6.30 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, क्वॉलकॉम 660 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली असून 12 आणि 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा व 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 3 जीबी व्हेरिएंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे.

@ रियलमी सी 3

रियलमी सी 3 हा स्मार्टफोन बाजारात 10 हजारांहून कमी किंमतीत उपलब्ध आहे. या फोनची किंमत 8000 रुपये इतकी आहे. 6.20 इंचाचा डिस्प्ले, MediaTek Helio P70 प्रोसेसर, 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 13+2 मेगापिक्सल रियर कॅमेरा, 4230mAh बॅटरी, Android Pie, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असे या फोनचे फीचर्स आहेत.

@. रेडमी 6 प्रो
शाओमी कंपनीचा हा बजेट फोन आहे. यात 5.84 इंचाचा डिस्प्ले, स्नैपड्रॅगन 625 प्रोसेसर असून 12 आणि 5 मेगापिक्सलचे रियर कॅमेरे आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 4,000 mAh दमदार बॅटरी असून 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत 9 हजार 999 रुपये आहे.

@. सॅमसंग गॅलेक्सी ए10
Samsung Galaxy A10 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. यात 6.20 इंचाचा डिस्प्ले,
3,400 mAh ची बॅटरी, 13 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. काळ्या आणि निळ्या रंगातील या फोनची किंमत 7 हजार 990 रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *