अश्विनची तडकाफडकी निवृत्ती ; वडिलांनी खरं काय ते बोलून दाखवलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० डिसेंबर ।। ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मालिकेदरम्यान रविचंद्रन अश्विनची अचानक निवृत्ती घेतली. महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही निवृत्तीच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अश्विनने निवृत्ती घेतल्यानंतर घाईघाईने भारतात परतणेही चर्चेत आहे. दरम्यान, अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी आपल्या मुलाचा संघात सतत अपमान होत असल्याचा आरोप केला आहे.

अश्विनने सर्व फॉरमॅटमध्ये ७६५ विकेट्स घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि कसोटी इतिहासातील भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. एका माध्यम वाहिनीशी खास बातचीत करताना त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. अश्विनच्या वडिल म्हणाले,” मलाही शेवटच्या क्षणी कळले. मी त्याच्यासाठी आनंदी आहे, पण त्याने ज्या पद्धतीने निवृत्ती घेतली त्यावर मी नाराज आहे. निवृत्ती घेण्याची त्याची इच्छा आहे, मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, पण या अचानक घेतलेल्या निर्णयामागे अनेक कारणे असू शकतात. फक्त अश्विनलाच माहीत, कदाचित त्याचा अपमान झाला असेल.”

अश्विनचा अपमान कोणी केला?
अश्विनचे वडील आपल्या मुलाच्या निवृत्तीमागे कोणतेही ठोस कारण सांगू शकले नाहीत, परंतु त्यांनी सूचित केले की उत्कृष्ट रेकॉर्ड असूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये नियमित स्थान न मिळणे हा अपमान वाटला असावा. विशेष म्हणजे, भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी सांगितले की, “अश्विन काही काळापासून निवृत्तीचा विचार करत होता आणि त्याने या स्टार क्रिकेटरला ॲडलेड ओव्हल येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीपर्यंत पुढे ढकलण्याचा सल्ला दिला होता.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *