Dinga Virus: कोरोना नंतर आता संपूर्ण जगात डिंगा डिंगा व्हायरसची दहशत; लागण होताच नाचू लागतात लोकं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० डिसेंबर ।। देशात अनेक व्हायरस आले आहेत. खासकरून कोरोना व्हायरसच्या एन्ट्रीनंतर लोकांच्या मनात एक वेगळी भीती आहे. कोरोना संपूर्ण जगात फैलावला होता आणि यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशाच एक नवा व्हायरस सध्या पसरताना दिसतोय. काय आहेत याचे धोके जाणून घेऊया.

सध्या एक व्हायरस आफ्रिकेतील युगांडामध्ये आढळून आलाय. या व्हायरसची ज्यामध्ये लोक नाचू लागतात आणि फिरू लागतात.

हा व्हायरस डिंगा डिंगा नावाने ओळखला जातो. प्रामुख्याने युगांडातील बुंदीबुग्यो जिल्ह्यांतील महिला आणि मुलींना या व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे त्यांचं शरीर थरथर कापू लागतं आणि त्यांना चालण्यास त्रास होतो. यावेळी रूग्णाचं शरीर अशा प्रकारे थरूथरू लागतं जसं ते नाचत असल्याचं दिसून येतं.

काय आहे हा व्हायरस?
रिपोर्ट्सनुसार, युगांडाच्या बुंदीबुग्यो जिल्ह्यात डिंगा डिंगा आजार पहिल्यांदाच दिसून आला आहे. यामध्ये लोक डान्स करत असल्यासारखं वाटतं. यावेळी शरीराची खूप हालचाल होत राहते. याशिवाय लागण झालेल्या व्यक्तींना खूप ताप, अशक्तपणा आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये अर्धांगवायू देखील होतो.

या आजाराने बाधित लोकांना चालण्यास त्रास होऊ लागतो. अंगात थरकाप जाणवतो आणि शरीर नियंत्रणात नसल्याप्रमाणे वाटतं. सध्या आफ्रिकेत डिंगा-डिंगा व्हायरस पसरण्याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. ज्या भागात हा आजार पसरला आहे तिथल्या लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या व्हायरसवर कसे उपचार करण्यात येतात?
डिंगा डिंगा या व्हयरसच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, यावर कोणताही योग्य ते उपचार नाहीत. सध्या त्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवून रुग्णाला औषधे दिली जात आहेत. ज्यामध्ये अँटिबायोटिक्सची मदत घेतली जातेय. या लक्षणांसोबतच अशक्तपणा आणि अर्धांगवायूचा त्रासही रूग्णांना होतो.

हा रोग विशेषतः युगांडातील महिला आणि मुलींना होत असल्याचं समोर आलं आहे. बुंदीबुग्योमध्ये या आजाराची ३०० हून अधिक प्रकरणं समोर आल्याची माहिती आहे. दरम्यान या व्हायरसमुळे कोणत्याही मृत्यूची अजून नोंद करण्यात आलेली नाही. 2023 मध्ये हा व्हायरस पहिल्यांदा आढळून आला होता. यावर डॉक्टरही नमुने घेऊन आरोग्य मंत्रालयाकडे विश्लेषणासाठी पाठवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *