महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ डिसेंबर ।। नवीन वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून सर्वसामान्य नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. २०२५ च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी काही खास तरतूद करण्याची शक्यता आहे. कोविडच्या आधी भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना ट्रेन तिकीटावर ४० ते ५० टक्के सूट दिली होती. ६० पेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांना ४० टक्के सूट मिळते तर ५८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांना तिकीटावर ५० टक्के सूट मिळत होती. (Railway Ticket Price)
भारतीय रेल्वेच्या मेल, एक्सप्रेस, राजधानी, दुरांतो या ट्रेनवर ही सुविधा देण्यात आली होती. परंतु कोविडच्या काळात ही सुविधा बंद करण्यात आली होती. आतापर्यंतदेखील ही सुविधा पुन्हा सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोविडमुळे ज्येष्ठ नागरिकांना ट्रेनच्या तिकीटात ५० टक्के सूट देण्यात आली होती. आता पुन्हा ही सुविधा सुरु केली जाऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणण्यांनुसार, सेवानिवृत्तीनंतर त्यांच्याकडे उत्पन्नाचा काहीच पर्याय नसतो. त्यामुळे त्यांना रेल्वे तिकीटावर मिळणारी सूट दिलासादायक वाटते. त्यामुळेच आता ही सुविधा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
२०२० मध्ये ही सुविधा बंद झाली होती. पु्न्हा ज्येष्ठ नागरिकांना ट्रेनच्या तिकीटात ५० टक्के सूट देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात याबाबत मोठी निर्णय होण्याची शक्यता आहे. (Railway Ticket price For Senior Citizen)