महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ डिसेंबर ।। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावी, ही अनेक शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण राजकीय पटलावर आम्ही कधीच एकत्र येणार नाही, असे विधानसभेवेळी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले होते. त्याशिवाय राज ठाकरेंनीही नकार दिला होता. मागील २० वर्षांपासून हे दोन्ही बंधू आपला वेगळा ठसा निर्माण करत आहेत. शिवसेना फुटल्यानंतर अनेकांना राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. राजकीय पटलावर या दोन्ही नेत्यांनी आपली वाट वेगळी असल्याचे सांगितले होतं. पण एका लग्नाच्या निमित्ताने हे दोन्ही ठाकरे एकत्र आले. दोघांनी मनसोक्त गप्पाही मारल्या. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी.. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली. एका लग्नसोहळ्यात त्यांनी गप्पा मारल्या, वेळ घालवला. काय चर्चा झाली, हे समोर आले नाहीत. या भेटीनंतर महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण तयार होणार का? याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
दादरमध्ये राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं थाटामाटात लग्न पार पडले. या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे सहकुटुंब आले होते. याच लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चर्चा झाली. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही अनेक मराठी माणसाची इच्छा आहे, पण राजकीय नाही तर कौटुंबिक कारणामुळे दोन ठाकरे एकत्र आले.