महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३० डिसेंबर ।। सध्या सगळीकडे उत्सुकता आहे ती अभिनेता विकी कौशलच्या आगामी छावा या सिनेमाची. या सिनेमात विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचा टिझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि लवकरच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होतोय. नुकतंच या सिनेमाच्या ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली.
विकीच्या बहुप्रतीक्षित छावा सिनेमाच्या ट्रेलर लाँचसाठी निर्मात्यांनी खास तारीख निवडली आहे. 16 जानेवारी 2024ला सिनेमा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. या तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्यांच्या राज्याभिषेक दिनादिवशी ट्रेलर लाँच करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
16 जानेवारीला सिनेमाच्या ट्रेलर रिलीज बरोबरच सिनेमाची अधिकृत रिलीज डेटही जाहीर करण्यात येणार आहे. हा सिनेमा फेब्रुवारीत रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. पण निर्माते हा सिनेमा कधी रिलीज करणार हे 16 तारखेलाच समजेल.
https://www.instagram.com/vickykaushal09/?utm_source=ig_embed&ig_rid=f4f88528-e78b-4fc0-ac90-ff9256bbecfd
14 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं म्हटलं जातंय. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या खास दिनाचं औचित्य साधूनचार दिवस अगोदर हा सिनेमा रिलीज करणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र अजून अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये.
दरम्यान हा सिनेमा 6 डिसेंबरला रिलीज होणार होता. पण 4 डिसेंबरला पुष्पा 2 रिलीज होणार होता. दोन्ही बिग बजेट सिनेमे क्लॅश होऊ नयेत म्हणून निर्मात्यांनी हा निर्णय घेतला. शिवाय या दोन्ही सिनेमात रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका होती.