CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना पोलिसांकडून दिली जाणारी मानवंदना बंद ; फडणवीस यांचा मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जानेवारी।। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात यापुढे महापालिका आयुक्तांनी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नयेत. त्याचबरोबर पोलिसांनी दौऱ्यादरम्यान मानवंदना ठेवू नये, असे स्पष्ट आदेश गुरुवारी मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत. राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त, पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासंदर्भात स्पष्ट आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून गुरुवारी देण्यात आले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध कामानिमित्त, बैठकांनिमित्त आणि इतर अनेक कार्यक्रमानिमित्ताने विविध जिल्ह्याला भेट देतात. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच पोलिसांकडून मानवंदना देण्याची प्रथा आहे. यापुढे ही प्रथा बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खरगे यांच्या सहीचे हे पत्रक आहे.

या पत्रकानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील दौऱ्यावेळी कोणतेही पुष्पगुच्छ आणू नये, अशी ताकीद देण्यात आली आहे. तर मुख्यमंत्र्यांना पोलिस दलाकडून देण्यात येणारी मानवंदनेची प्रथा त्यांच्या दौऱ्यात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, पोलिस महानिरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, महानगरपालिकेचे आयुक्त आणि सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे आदेश देण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यातील मंत्र्यांचा सत्कार
दरम्यान, देवेंद्र फडणवीस परत एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणे ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्यावतीने लवकरच नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागपूरचेच महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांचा सत्कार करण्यात येणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता असूनसुद्धा काँग्रेसनेही विरोधकांच्या या प्रस्तावाला अनुमोदन दिले आहे.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकारी, सदस्यांची शेवटची सर्वसाधारण सभा गुरुवार, २ जानेवारी रोजी झाली. सभेच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषदेतील भाजपचे विरोधीपक्षनेते आतिष उमरे यांनी सभागृहाला सांगितले की, राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रीमंडळाचे गठण झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा नागपूरकर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे स्वीकारली आहेत. याशिवाय नागपुरातीलच चंद्रशेखर बावनकुळे यांची महसूलमंत्री आणि अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्याबाबत या सर्वांचा अभिनंदनाचा ठराव मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *