दुधात भेसळ करणाऱ्याच्या विरोधात होणार कठोर कारवाई; दुग्धविकास मंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी- मुंबई – दि. १३ ऑगस्ट – राज्यातील दुधात होणाऱ्या भेसळीविरोधात दुग्धव्यवसाय विकास विभाग अन्न व औषध प्रशासन विभागाच्या समन्वयाने कारवाई करणार आहे. याशिवाय प्रमाणित नसलेल्या दुधात निळ टाकण्याचे निर्देशही पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी दिले आहे. मंत्रालयातील दालनात दुध भेसळ रोखण्यासंदर्भात करण्यात येत येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरीता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पिशवीबंद दुधाची मागणीत घट झाली असून, हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्टांन्ननिर्मीत केंद्र मोठ्या प्रमाणात बंद झाली आहे. परिणामी, राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्यांकडे अतिरीक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता. तो प्रश्न सरकारने दुध भुकटीच्या स्वरुपात सोडवला. तसेच दुधाची मागणी आणि पुरवठा याचा समतोल राखण्याकरीता दुग्ध व्यवसाय विभागाने दक्ष राहावे, असेही केदार यांनी सांगितले आहे. राज्यात भेसळयुक्त दुध ग्राहकांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होतो. दुध भेसळ रोखल्यास शेतकऱ्यांच्या दुध विक्री हा जोड धंदा किफायतशीर ठरणार असून, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी दुध भेसळ हा विषय गांभीर्याने हाताळावा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. दुध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीसांची मदत घेण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. भविष्यात दुध भेसळ करण्याचे धाडस करणार नाही, अशी कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. अशा यावेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिल्या. या बैठकीत दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त सुमंत भांगे अन्न व औषध विभागाचे आयुक्त अरुण उन्हाळे दुग्ध व्यवसाय विभागाचे उपायुक्त एस.आर. सिरपुडकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अद्ययावत साधने उपलब्ध करावीत
दुध भेसळ रोखण्याकरीता सरकारकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल व्हॅन अद्ययावत कराव्या. त्यासाठी लागणारे रसायन तत्काळ उपलब्ध करावे. तंत्रज्ञ व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात यावे. अशा सूचनाही केदार यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

दुधातील होणारी भेसळ रोखण्याकरीता दुधाचे नमुने तपासण्याकरीता स्वत: मराठवाडा विभागात जाणार असून, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे पश्‍चिम महाराष्ट्रातील दुधाचे नमुने तपासण्याकरीता जाणार आहे. तसेच मुंबईसह ठाणे या भागात दुग्धव्यवसाय विभागाचे आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त हे दुधाचे नमुने तपासून दोंषीवर कारवाई करणार आहे.
– सुनील केदार, दुग्धविकास मंत्री.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *