इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाची सर्वोत्तम प्लेइंग 11 कशी असेल? : संभाव्य ११

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जानेवारी ।। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा एकदा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी भारतीय संघ इंग्लंडशी सामना करेल. या मालिकेत पाच सामने खेळले जाणार आहेत, जे खूप महत्त्वाचे असतील. बीसीसीआयने यासाठी संघ जाहीर केला आहे. पहिल्या सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विशेषतः जर आपण तिसऱ्या क्रमांकाबद्दल बोललो तर, येथे फलंदाजीसाठी कोण येणार यावर पडदा अजून उठलेला नाही.

अभिषेक आणि सॅमसन सलामीला येणार
22 जानेवारी रोजी कोलकाता येथे पहिला टी-20 सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची सलामी जोडी जवळजवळ निश्चित झाली आहे. संघात फक्त दोनच सलामीवीरांची निवड झाली असल्याने जास्त विचार करण्याची गरज नाही. अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन डावाची सुरुवात करताना दिसेल. आधी अशी अपेक्षा होती की ऋतुराज गायकवाडलाही संघात स्थान मिळू शकते, परंतु निवडकर्त्यांनी काहीतरी वेगळाच विचार केला असेल, त्यामुळे संघात फक्त दोनच सलामीवीर निवडण्यात आले आहेत.

तिसऱ्या क्रमांकासाठी सूर्या की तिलक वर्माला संधी?
जर आपण तिसऱ्या स्थानाबद्दल बोललो तर हे स्थान कर्णधार सूर्यकुमार यादवचे आहे आणि त्याने या क्रमांकावर स्वतःला सिद्ध केले आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने दोन शतके ठोकली. त्यामुळे, आता त्यानेही तिसऱ्या स्थानासाठी आपला दावा केला असून कर्णधार सूर्या पुन्हा तिलकला या जागेवर खेळण्याची संधी देणार का हे पाहणे मनोरंजक ठरेल.

पंड्या-रेड्डी दाक्गवणार अष्टपैलू चमक
हार्दिक पंड्याचीही संघात निवड झाली आहे, त्यामुळे त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. दुसरीकडे नितीश कुमार रेड्डीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी केली आहे. पंड्या आणि रेड्डी अष्टपैलू म्हणून भूमिका बजावतील. फलंदाजीव्यतिरिक्त, गोलंदाजीतही दोघे संघाला मजबूत बनवतीक. रिंकू सिंग पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका साकारताना दिसेल.

शमीचे पुनरागमन
मोहम्मद शमीचे बऱ्याच काळानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. जरी तो देशांतर्गत क्रिकेट खेळला असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याला काही आंतरराष्ट्रीय सामनेही खेळावे लागतील, जेणेकरून तो त्याची तंदुरुस्ती सिद्ध करू शकेल. त्याचे खेळणे देखील जवळजवळ निश्चित आहे. अर्शदीप सिंग त्याला साथ देताना दिसेल. दुसरीकडे, जर आपण फिरकीपटूंबद्दल बोललो तर अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती हे चांगले पर्याय आहेत. या मालिकेसाठी अक्षर पटेलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, म्हणजेच तो खेळेल हे निश्चित आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *