![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जानेवारी ।। चीनच्या वतीनं कैलास मानसरोवर यात्र सुरू करण्यासाठी हिरवा कंदिल दाखवण्यात आला असून, आता अनेक इच्छुकांनी या यात्रेसाठीच्या प्रवासखर्चापासून तिथं नेमकं कसं पोहोचायचं इथपर्यंतची माहिती मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सनातन धर्मासह जगातील विविध धर्मांमध्येही कमालीचं महत्त्वं असणाऱ्या या कैलास पर्वतावर आजही शंकर आणि पार्वतीचं अस्तित्वं असल्याचं म्हटलं जातं. हिमालय पर्वतरांगेच्या सर्वात उंच पर्वतशिखरांपैकी एक असणाऱ्या या पर्वतापर्यंत पोहोचण्याचा प्रवास तसा अतिशय खडतर. हाच प्रवास करण्यासाठी यंदाही अनेकांनीच इच्छा व्यक्त केली आहे.
यात्रेसाठीची सर्वात पहिली पायरी
कैलास मानसरोवर यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं अपेक्षित आहे. यात्रेला जाण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो, पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाचा फोटो, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल अशी माहिती असणं आवश्यक आहे. या यात्रेसाठी 25 दिवसांचा कालावधी आवश्यक असून, यासाठीचा खर्च आहे साधारण 1.5 ते 3 लाख रुपये (माणसी). यात्रेपूर्वी होणाच्या वैद्यकिय चाचणीमध्ये काही त्रुटी आढळल्यास अनेकजण या यात्रेला मुकण्याची शक्यता असते.
यात्रेसाठीचा खर्च
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार या यात्रेसाठी सर्वप्रथम तुम्हाला KMVN म्हणजेच कुमाऊं मंडल विकास निगम ला 32,000 इतकी फी द्यावी लागते. यात्रा निश्चित करण्यासाठी डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून 5000 रुपयांची नॉन रिफंडेबल फी तुम्हाला भरावी लागते. उर्वरित 27000 रुपये तुम्ही दिल्लीत येऊन भरू शकता.
दिल्ली हार्ट एंड लंग इंस्टीट्यूटमधून यात्रेसाठी इच्छुकांनी 3,100 रुपयांची फिटनेस टेस्ट करत, तुम्हाला स्ट्रेस इको टेस्टसाठी 2500 रुपये भरावे लागतील. तर, 2,400 रुपये व्हीसा शुल्क भरावं.
मुक्कामासाठी तुम्हाला तिबेटमध्ये चिनी अधिकाऱ्यांना 48,861 रुपये इतकी रक्कम द्यावी लागेल. यामध्ये इमिग्रेशन फीस, भोजन, सामानाची ने आण, घोड्याचं भाडं, कैलास, मानसरोवर प्रवेश तिकीटांचा समावेश आहे.
भारताकडून तुम्हाला दोन्ही बाजूंसाठी 8904 रुपये पोर्टर फी द्यावी लागेल. नारायण आश्रम ते लिपुलेख पर्यंतच्या परतीच्या प्रवासासाठी आणि धारचूला इथं पोनी आणइ कुलीसाठी भाडं म्हणून तुम्हाला 10666 रुपये इतकी रक्कम मोजावी लागेल.
यामध्ये ग्रुप अॅक्टिव्हीटीसाठी 2000 रुपये आणि यात्रेशी संबंधित इतर खर्चांसाठी साधारण 20000 रुपये प्रदान करावे लागतात.

