AB de Villiers चा ४ वर्षांनंतर क्रिकेटमध्ये कमबॅक! वर्ल्ड चॅम्पियन्सशीप स्पर्धेत करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जानेवारी ।। जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाजी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलिर्स ४ वर्षांनंतर पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन्सशीप लेजेंड्स (WCL) स्पर्धेत एबी डिव्हिलिर्स पुन्हा मैदानावर फटकेबाजी करताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत एबी गेम चेंजर्स दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व करणार आहे.

४ वर्षांनंतर क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दल बोलताना एबी डिव्हिलिर्स म्हणाला, “मी चार वर्षांपूर्वी क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. कारण मला त्यावेळी आणखी खेळण्याची इच्छा नव्हती. पण त्यांनतर वेळ निघून गेली आहे, माझ्या मोठ्या मुलाने खेळायला सुरूवात केली आहे. आम्ही बागेत अधिकाधिक वेळा खेळत आलो आहोत आणि पुन्हा खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल बरं वाटत आहे. यासाठी मी पुन्हा जिम आणि नेटकडे वळणार आहे.”

दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाचे सहमालक या स्पर्धेसाठी उत्सुक असल्याचे सांगितले, “आम्ही ही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक आहोत. एबी डिव्हिलिव्हर्स संघात परतणार आहे व संघाचे नेतृत्व करणार आहे. यामुळे आमच्या संघाला नवी उर्जा मिळेल व संघ नव्या उंचीवर पोहोचेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *