नवी नंबरप्लेट आवश्यक, RTO कडून ३१ मार्चपर्यंत मुदत ; कोणत्या वाहनासाठी किती पैसे भरावे लागणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. १३ फेब्रुवारी ।। ‘केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया’ने २०१९ च्या आधीच्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक केले आहे. याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे.

देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना ‘एचएसआरपी’ देणे बंधनकारक केले होते. याबाबतचे आदेश ‘केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया’ने २०१८ मध्ये दिले होते; तसेच २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला होता. या अधिकाराअंतर्गत दिल्लीसह अनेक राज्यांनी ‘एसएसआरपी’ बंधनकारक केले आहे. मात्र, महाराष्ट्रात अजूनही २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बंधनकारक नव्हते.

विभागाने राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’ लावणे बंधनकारक केले आहे, पुणे, पिंपरी-चिंचवड आरटीओसाठी खासजी एजन्सीची त्यासाठी नियुक्ती केली आहे. या एजन्सीमार्फत पुणे जिल्ह्यातील वाहनांना नंबरप्लेट लावण्यात येणार आहे.

पुण्यात ६९ केंद्रे
पुण्यात वाहनांची संख्या अधिक असल्याने पुण्यात ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी ६९ केंद्रे स्थापन केली आहेत. रोझमां सेफ्टी सिस्टीम लि.’ या कंपनीला हे काम दिले असून https://mhhsrp.com या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. आतापर्यंत या लिंकवर दहा हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. जानेवारीपासून नंबरप्लेट बसविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

‘एचएसआरपी’ आवश्यक का ?
या नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहेत. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते. त्यावर इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो आणि हा नंबर प्रेशर मशिनद्वारे लिहिला जातो. अशा प्लेटचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटल्यावर पुन्हा जोडता येत नाही. ही प्लेट वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि कुणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाला अपघात झाला, तर गाडीला लावलेली ‘हाम सिक्युरिटी नंबरप्लेट’ वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अधिकृत सेंटरवरूनच बसवून घ्यावी. मदतीसाठी ७८३६८८८८२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, स्वप्नील भोसले यांनी दिली आहे.

नंबर प्लेटसाठीचे शुल्क किती?
दुचाकी, ट्रॅक्टर – ४५०
तीनचाकी – ५००
चारचाकी व अन्य – ७४५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *