Ladli Lakshmi Yojana: मुलींना जन्मापासून ते शिक्षणापर्यंत सरकार देतंय १ लाख ४३ हजार रुपये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. १५ फेब्रुवारी ।। प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलींच्या भविष्याची चिंता असते. मुलींच्या भविष्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केलेल पैसे ते मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी वापरतात. मुलींसाठी अनेक सरकारी योजनादेखील राबवण्यात आल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे लाडली लक्ष्मी योजना. (Ladli Lakshmi Yojana)

लाडली लक्ष्मी योजनेत मुलींना जन्मापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व खर्च सरकार करते. मध्य प्रदेश सरकारने लाडली लक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना जवळपास १ लाख ४३ हजार रुपयांची मदत केली जाते.

लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत मुलींना मुलींना सरकारकडून वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये १,४३,००० रुपये दिले जातात. या योजनेत मुलगी सहावीत गेल्यावर २००० रुपये दिले जातात. मुलगी नववीत गेल्यावर ४००० रुपये दिले जातात. अकरावीत प्रवेश घेण्यासाठी ६००० रुपये दिले जातात. तर १२वीत प्रवेश घेण्यासाठी ६ हजार रुपये दिले जातात.

मुलींना जर दहावी किंवा १२वीनंतर व्यावसायिक कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर २५,००० रुपयांची मदत केली जाते. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.

तुमची मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिला १ लाख रुपये दिले जातात.या योजनेत मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च सरकार करते. या योजनेत तुम्ही मुलींच्या नावावर खाते उघडू शकतात.https://ladlilaxmi.mp.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स, फोटो असणे आवश्यक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *