Chhaava Movie Box Office Collection: ‘छावा’ चा बॉक्स ऑफिसरवर डंका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. १५ फेब्रुवारी ।। अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतिक्षित चित्रपट छावा १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित या चित्रपटांची प्रेक्षकांना उत्सुकता होती. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? हे जाणून घेऊ या. 

ट्रेड रिपोर्टनुसार, छावा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा मोठा उच्चांक गाठला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३१ कोटी रूपयांची दमदार कमाई केली आहे. मोठ्या संख्येने या चित्रपटाला प्रेक्षकांकडून यश मिळाले आहे.

चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ५ लाख तिकीट बुक झाले होते यामध्ये १३. ७० कोटींची कमाई झाली होती. छावा हा चित्रपट १३० कोटींचा बिग बजेट चित्रपट आहे. चित्रपट निर्मात्याकडून चित्रपटांविषयी मोठ्या अपेक्षा असल्याने चित्रपट यशस्वी ठरणार असल्याचे पहिल्या दिवशीच्या कमाईवरून दिसत आहे.

छावा हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईची भूमिका साकारली आहे. त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक विकीच्या भूमिकेचे कौतुक करत आहे. याशिवाय या चित्रपटात अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, डायना पेटी यांच्या भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *