३१ मार्चपर्यंत ही ५ कामे नक्की करा, अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ मार्च ।। मार्च महिना सुरु झाला आहे. लवकरच आर्थिक वर्ष संपणार आहे. या आर्थिक वर्षात तुमची काही कामे करायची राहिली असेल तर लवकरच करा. अन्यथा तुम्हाला पुढच्या आर्थिक वर्षात विनाकारण पैसे भरावे लागतील. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

दर महिन्यात पैशांशी संबंधित अनेक कामे असतात. यात टॅक्स सेव्हिंगपासून ते एफडीपर्यंत अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्याची योग्य वेळ असते. जेणेकरुन तुमच्या पैशांची बचत होऊ शकते. या महिन्यात तुम्ही ही कामे नक्की करा, अन्यथा आर्थिक नुकसान होईल.

टॅक्स वाचवण्याचा पर्याय
जर तुम्ही जुन्या टॅक्स प्रणालीचा निर्णय घेतला असेल तर ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करा. इन्ककम टॅक्स अॅक्टअंतर्गत नॅशनल पेन्शन सिस्टीम, एम्प्लॉइज प्रोव्हिडंट फंड, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात.

इन्कम टॅक्स रिटर्न
जर तुम्ही आयटीआर भरताना कोणतीही चूक केली असेल तर त्यासाठी ३१ मार्च २०२५ अपडेटेड रिटर्न भरु शकता. तुम्ही आर्थिक वर्षानंतर दोन वर्षांपर्यंत आयटीआर यू भरु शकतात.

ईपीएफ
जर तुम्ही ईपीएफ सदस्य असाल तर १५ मार्चपर्यंत युनिव्हर्सल अकाउंट नंबर अॅक्टिव्हेट करा.यानंतर तुम्ही ऑनलाइन मॅनेज करु शकतात. या एम्पलॉइ डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स योजनेत ७ लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळेल.

एसबीआय एफडी स्कीम
स्टेट बँकेत अमृत वृष्टी एफडी स्कीम ४४४ दिवसांची आहे. या योजनेत तुम्हाला ७.२५ टक्के व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. त्यामुळे त्याआधी गुंतवणूक करा.

आयडीबीआय स्पेशल एफडी
आयडीबीआय स्पेशल एफडीत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. या योजनेत मॅच्युरिटी कालावधीनुसार व्याजदर बदलतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *