महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. ९ मार्च ।। चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे पारडे किंचित जड असल्याचे मत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व सध्याचे समालोचक रवी शास्त्री यांनी शनिवारी व्यक्त केले, मात्र न्यूझीलंडचा संघ चमकदार खेळ करीत आहे. भारतीय संघाला या स्पर्धेमध्ये एकच संघ पराभूत करू शकतो. तो संघ म्हणजे न्यूझीलंड. त्यामुळे न्यूझीलंड संघालाही कमी लेखता येणार नाही.
रवी शास्त्री यांनी याप्रसंगी न्यूझीलंड संघातील खेळाडूंच्या खेळाचे कौतुक केले. ते म्हणाले, राचिन रवींद्र याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. केन विल्यमसन हा शांत स्वभावाचा अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. मिचेल सँटनर हा बुद्धिवान कर्णधार आहे. ग्लेन फिलिप्सकडे सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघ अंतिम फेरीत दमदार कामगिरी करू शकतो.
आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमधील परिस्थिनुसार दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावरील खेळपट्टी ही संथ आहे. सामन्याच्या सुरूवातील वेगवान गोलंदाजांना मदत होते व त्यांना सुरूवातीच्या षटकांमध्ये विकेट्स मिळू शकतात. पण जसजसा सामना पुढे जाईल तशी खेळपट्टी संथ होते. ज्यामुळे फिरकीपटूंना विकेट्स घेण्याची संधी निर्माण होते.
विल यंग, रचिन रविंद्र, केन विल्यमसन, डॅरी मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सॅंटनर (कर्णधार), मॅट हेन्री/जेकब डफी, कायल जेमिन्सन, विल्यम ओ’रुर्क
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वरूण चक्रवर्थी, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.