महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. २३ मार्च ।। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधला आहे. लालकृष्ण आडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहात नाही,असे संजय राऊतांनी म्हटले आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
थडग्यातील औरंगजेब जिवंत केला, या रोखठोखमधून संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. औरंगजजेबाने त्याचा बाप, भाऊ यांना तुरूंगात डांबले अथवा संपवले. लालकृष्ण आडवणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना कैद झालेल्या शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही. भारतामधील एक प्रख्यात सिने कुटुंब आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवते आणि आपले पंतप्रधान त्या तैमूरचे कौतुक करतात. ते सर्व औरंगजेब कबर खात्याचे लोक सहन करतात, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
आता ज्यांना औरंगजेबाचे थडगे पाडायचे आहे, त्यांना हा ताजमहालही उखडायचा आहे काय? औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात राजकारण होते हे योग्य नाही. औरंगजेबाचे थड़गे हे मराठा शौर्याचा विजयस्तंभ आहे. तो स्तंभ पाडू पाहणारे इतिहासाचे शत्रू आहेत. थडग्यातला औरंगजेब महाराष्ट्रातल्या मूर्खांनी जिवंत केला. तो त्यांच्याच मानगुटीवर बसला, असे संजय राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटले आह.
भाजपवर निशाणा –
१९९० साली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद या शहरात आले. त्यांनी औरंगदेबाची कबर खोता असे सांगितले नाही. तर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करून ऐरंगजेबाचे अस्तित्वच येथे संपवले. औरंगाजेबाच्या अनेक बेगमा होत्या. पण हिराबाईवर त्याचे प्रेम होते. ती सुद्धा गुजरातचीच होती. आता दिल्लीत गुजराती राज्यकर्त्यांचीच सत्ता आहे. त्याच राज्यकर्त्यांच्या समर्थकांना औरंगजेबाची कबर उखडायची आहे, असे संजय राऊतांनी आपल्या सामनातील सदरात म्हटले आहे.
बाबर संपला, आता, हिंदू-मुसलमानांचा झगडा लावण्याची बाबराची क्षमता आता संपली. पाकिस्तानमुळेही दंगे पेटत नाहीत. त्यामुळे कबरीतला औरंगजेब बाहेर काढण्याची योजना आली. महाराष्ट्रातील एक आमदार अबू आझमी म्हणाले, “औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याची लढाई ही धर्माची नव्हती तर सत्तेची होती. त्याने अनेक हिंदू मंदिरे बनवली.” आझमी यांच्या वक्तव्यावरून गोंधळ झाला. मुसलमानांना आजही बाबर, औरंगजेब वगैरे त्यांचे शासक वाटतात व त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जातात.