देवेंद्र फडणवीस यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले 2014 साली शिवसेनेचा मुख्यमंत्री ……..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ मार्च ।। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2014 सालची शिवसेना भाजप युती तुटण्याची इनसाईड स्टोरी प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे. 2014 साली नेमकं काय घडलं याबाबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले.

सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांच्या सत्कार समारंभ वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटण्याची इनसाईड स्टोरी सांगितली. शिवसेनेला तेव्हा 147 जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल आणि आमचा उपमुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरलं होतं असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र उद्धव ठाकरे हे 151 वर ठाम राहिले आणि युती तुटली असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शिवसेना 147 आणि भाजप 127 असा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव होता. मात्र उद्धव ठाकरे 151 वर अडून बसले असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना 147 आणि भाजप 127 अशा जागा लढून शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री असा प्रस्ताव असल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आमचे मित्र शिवसेनेचे अध्यक्ष यांच्यासोबत आमचा तेव्हा बोलणं सुरु होतं. आम्ही त्यांना जास्त जागा द्यायला सुद्धा तयार होतो. त्यांनी आपल्या मनात 151 चा आकडा पकडला होता. तेव्हा ओमप्रकाश माथूर यांनी अमित शहा यांच्या सोबत बोलणं केलं आणि सांगितलं की अशाप्रकारे चालणार नाही. अमित शहा यांनी पंतप्रधान यांच्या सोबत बोलणं केलं आणि तेव्हा ठरलं की आम्ही 127 आणि ते 147 असा फॉर्म्युला ठरला तर होईल नाहीतर युती राहणार नाही. तेव्हा मी अमित शहा आणि ओमप्रकाश मधुर आम्ही आत्मविश्वास होता की आम्ही लढू शकतो. बाकी पक्षात कोणाला आत्मविश्वास नव्हता.

या विश्वासाच्या जोरावर आम्ही शिवसेनेला अल्टीमीटर दिलं आणि सांगितलं की 147 वर तुम्ही लढणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही 127 लढू. दोघांचेही चांगला निकाल लागेल दोघांचेही मिळून 200 च्या वर निवडून येतील. तुमचा मुख्यमंत्री बनेल आणि आमचा उपमुख्यमंत्री बनेल. पण विधाताच्या मनात काही वेगळंच होतं. मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं. पण नाही युवराज नाही घोषणा केली की 151 आणि त्यामध्ये एकही सीट कमी होणार नाही. ते कौरवांच्या मूडमध्ये आले पाच गाव सुद्धा देणार नाहीत. पाचगाव नाही देणार तर श्रीकृष्ण आमच्या सोबत आहेत. लढाई झाली मी तेव्हा प्रचारात होतो पण पाठीशी ओम प्रकाश माथुर आणि अमित शहा होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रेडिबिलिटीमुळे इतक्या कमी वेळात पहिल्यांदाच आम्ही 260 सीट लढलो. त्याआधी आम्ही 117 पेक्षा जास्त जागा लढलोच नाही. 260 जागा लढलो आणि तेव्हापासून आम्ही सगळ्यात मोठी पक्ष म्हणून उभा राहिलो. तेव्हापासून आजपर्यंत शंभर पार करणारी महाराष्ट्रातील मागील 30 वर्षातील ही एकमेव पार्टी आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमित शहा आणि ओम प्रकाश मातुर यांना जातं असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *