महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ मार्च ।। सध्या लग्नसराईचे तोंडावर येत असताना ग्राहक मोठ्या संख्येने सोनं-चांदी खरेदी करत आहेत. त्यामध्ये ग्राहकांसाठी आणखी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किमती कमी होताना दिसत आहेत. तर गेल्या आठवड्यातही सोन्याचा भाव घसरला होता. चला तर जाणून घेऊया आजचा सोने-चांदीचा आजचा भाव नक्की कसा असणार आहे. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ८,१९५ रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत आज सुमारे ८,९४० रुपये आहे. पुढे आपण कोणत्या शहरात किती भाव असणार आहे हे जाणून घेऊ.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ८,१९५ रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ८,९४० रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
१ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७०५ रुपये इतका आहे.
विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव
मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५रुपये इतका आहे.
मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
अमरावतीत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५ रुपये इतका आहे.
अमरावतीत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
जळगावात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५ रुपये इतका आहे.
जळगावात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
नागपुरात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,१९५ रुपये इतका आहे.
नागपुरात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४० रुपये इतका आहे.
चांदीचा भाव कितीने घसरला?
आज सुद्धा चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. चांदीचा भाव आज 1,02,000 रुपये इतका आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात हा भाव कमी होण्याची शक्यता आहे. तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर चांगली संधी मिळणार आहे.