महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ मार्च ।। दिनांक 23 मार्च 2025 रविवारी श्री, म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक या ठिकाणी 1999 ते 2000 सालच्या दहावीच्या बॅचचा विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा जोरदार साजरा करण्यात आला, दहावीतील जवळपास 80 विद्यार्थी व 30 शिक्षक वृंद, रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी आपल्या दहावीच्या शाळेमध्ये या स्नेह मेळाव्या साठी पुन्हा एकत्र जमले व शालेय जीवनातील गत आठवणींना नव्याने उजाळा दिला.
तत्कालीन प्राचार्य श्री. रावसाहेब आवारी व उपमुख्याध्यापक बी. टी कदम सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते समारंभाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षक वृंदांचे शाल श्रीफळ व शाल व सन्मानचिन्ह देऊन हार्दिक स्वागत केले या ठिकाणी वनिता देशमुख मॅडम, संगीता निंबाळकर मॅडम, एन. जी पानसरे-पोळ मॅडम,ए. व्हि बाणखेले मॅडम, आर. एस. बागुल मॅडम, एल. पी. जगताप – अवसरे मॅडम तसेच एस. आर. सूर्यवंशी मॅडम आणि ए. पी. जोशी मॅडम, मनीषा साठे मॅडम, सीमा भोसले मॅडम, दिलीप भोसले सर या विविध विषयाच्या शिक्षिका व शिक्षक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पी. टी च्या एस. कवे मॅडम यांच्या कवायतीने तसेच राष्ट्रगीत म्हणून य झाली आर. एस. पी. च्या ए. व्हि. घोडके मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीत उभे राहण्यास पुन्हा फर्मान सोडले व शालेय जीवनात गेल्याचा जणू भास विद्यार्थ्यांना झाला. गणित विषयाचे डि. के. काळे सर व एस. डी. काळे मॅडम उपस्थित होते बि. डी भोसले सर, नारायण घोटकुले सर, डि. एन. पांडव सर व पिरंगुट कॉलेजचे सध्याचे प्राचार्य वाय. एस. गोवेकर सर, केशव जाधव, आणि म्हाळसाकांत विद्यालयाचे प्राचार्य श्री. मालुसरे सर उपस्थित होते याव्यतिरिक्त बि. जी. गायकवाड सर शितोळे सर आणि आर. सी. कुसाळकर सर, ए.बी.सांडभोर सर हेही उपस्थित होते यावेळी शिक्षकांनी मनोगत मांडले व तब्बल पंचवीस वर्षानंतर झालेल्या भेटीमुळे अत्यंत आनंद झाल्याचा त्या ठिकाणी नमूद केले सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले या ठिकाणी सूत्रसंचालन विद्यार्थ्यांपैकी अमोल मोरे व दिलीप मोरे यांनी केले प्रास्ताविक किरण घोटकुले यांनी केले आभार प्रदर्शन श्री. आशिष सूर्यवंशी यांनी केले. स्नेहभोजन समारंभ हा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला अल्प परिचय करून दिला विद्यार्थी मित्रांनी शिक्षक गुरुजन वर्गांचे आभार मानले व त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे सध्या हे सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये. सामाजिक राजकीय शैक्षणिक व आरोग्य असो या सर्व क्षेत्रांमध्ये सफल झाल्याचे श्रेय उपस्थित शिक्षकांना दिले कार्यक्रम सांगता पसायदान म्हणून झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. प्रीतम पवार, श्री.पराग घोडके, श्री. अविनाश खाडे श्री अमित भालेराव, अमोल बनसोड, श्री जीवन ढवान, डाॅ. अपर्णा कोल्हे – पाटील, अर्चना थोरात, तनुजा माने, श्री. प्रशांत शिंदे, चेतन विसपुते, अभिजीत मळीक तसेच कमलेश बोरकर, आरिफ शेख या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे दहा ते पंधरा विद्यार्थी हे परदेशामधून ऑनलाइन गुगल मीट द्वारे सहभागी झाले होते तसेच कार्यक्रमाचे प्रक्षेपण हे ऑनलाइन सुध्दा करण्यात आले.