महाराष्ट्र्र 24 : ऑनलाईन : दिनांक 25 मार्च: महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष या पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आण्णा बनसोडे यांनी अर्ज भरला या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. बनसोडे यांनी आपला अर्ज विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांचेकडे सादर केला. तीन वेळा पिंपरी विधानसभा मतदारसंघातून बहुमताने निवडून आलेले अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात.
आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, हा निर्णय
राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा ठरला आहे.. अनेक इच्छूक कार्यकर्ते पदाधिकारी निवडणूकीच्या तयारीला लागले आहे.
उपाध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे मुंबई ते पिंपरी फोर व्हीलर रॅली काढत महापुरुषांना अभिवादन करत येणार आहेत..