महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. २९ मार्च ।। दिशा सालियन हिच्या मृत्य प्रकरणात (Disha Salian Case) दररोज नवनवे दावे प्रतिदावे होता आहे. आता दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील मालवणी पोलिसांचा जुना क्लोजर रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच एकप्रकारे दिशाच्या आत्महत्येसाठी कारणीभूत धरल्याचं दिसतंय. दिशा सालियन वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन थकली होती. कष्टानं कमावलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्याने दिशाने याबाबत मित्रांशी सुद्धा बोलणं केलं होतं. याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्या सतीश सालियन यांनाच आता संशयाच्या घेऱ्यात उभं केलं जातंय. (Disha Salian Case Latest Marathi News)
सतीश सालियनचे वकील काय म्हणाले?
दिशाच्या वडलांचे काही विवागबाह्य संबंध होते, ती त्यांना पैसे द्यायची, त्यातून ती निराश होती. हे सर्व मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये लिहिल्याचा दावा केला जातोय. मात्र जर तो रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय, तर मग तो वैध कसा?, त्यातील गोष्टींना काही अर्थच उरत नाही, असं सतीश सालियनचे वकील निलेश ओझा म्हणाले. तसेच पोलिसांनी रिपोर्ट मागे घेतल्यानंतर एसआयटीची स्थापना झाली, आणि नव्यानं तपास सुरू झालाय. त्यामुळे या रिपोर्टचा आरोपींना बचावात काहीही फायदा होणार नाही, असंही निलेश ओझा यांनी सांगितले.
केरळमध्ये एका गरोदर हत्तीणीसोबत घडलेल्या घटनेनं दिशा सालियन नैराश्येत-
दिशा सालियनचा मित्र रोहन रायनं वर्षभरानंतर एका मुलाखतीत दिशाच्या मृत्यूबाबत काही गौप्यस्फोट केले होते. 15 नोव्हेंबर 2022 रोजी एका वृत्तपत्रात ही मुलाखत छापून आली होती. दिशा प्राण्यांच्या समस्यांबाबत फार संवेदनशील होती, केरळमध्ये एका गरोदर हत्तीणीसोबत घडलेल्या घटनेनं ती नैराश्येत होती, असं म्हटलं होतं. पोलिसांच्या अहवालात तिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध असल्यानं ती नौराश्येत होते, असं लिहिल्याचं बोललं जात आहे. मालवणी पोलिसांनी किती खोटे पुरावे तयार केले आहेत, यासाठी त्यांना नोबल पुरस्कार मिळायला हवा, अशी टीकाही निलेश ओझा यांनी केली.
दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू-
दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.