महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. २९ मार्च ।। पोलिसांनी ठरवलं असते तर सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांचा जीव वाचला असता का? हा प्रश्न विचायरण्याचे कारण संतोष देशमुख केज वरून मस्साजोगकडे प्रवास करताना सोबत असलेल्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब ठरला आहे. सरपंच संतोष देशमुख यांचं ज्या केज-बीड रस्त्यावरील टोल नाक्यावरून अपहरण झालं, त्यावेळी सरपंच यांची गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला आणि अपहरण झालं. त्यानंतर सदरील व्यक्तीने सरपंच यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांना घटनाक्रम सांगितला. धनंजय यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास सांगतील. सदरील प्रत्यक्षदर्शी पोलीस स्टेशनला गेले, मात्र त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तीन ते साडेतीन तास बसून ठेवण्याचं त्यांनी आपल्या जबाबमध्ये म्हटले आहे. नवीन कायदा आहे, पुस्तक बघून जबाब लिहावा लागतो, असं कारण दिल्याचही प्रत्यक्षदर्शीने आपल्या जबाबामध्ये सांगितलं आहे.
प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानं केज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनचे पीआय महाजन आणि आणखीन एक बनसोडे नावाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना सर्व हकीगत सांगितल्याचे ही जबाबमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे घटनेच्या काही दिवसांपूर्वी आवादा कंपनीने या आरोपीच्या विरोधात कंपनीत येऊन धमकावल्याची तक्रार दिली होती. घटनेचं गांभीर्य पीआय यांना माहिती होतं, ठरवलं असतं तर सहा आरोपींचे मोबाईल, लोकेशन दहा मिनिट फार तर एक तासात घेता येऊ शकले असते. ज्या दिशेने संतोष देशमुख यांचं अपहरण करून स्कार्पिओ गेली आहे तिकडे शोध घेता येऊ शकला असता मात्र, तसं काहीच केलेलं दिसत नाही. ज्यावेळी पोलीस स्टेशनला संतोष देशमुख गंभीर अवस्थेत मिळाले आहेत, असा पोलीस स्टेशनला फोन येतात, सदरील प्रत्यक्षदर्शीचीही तात्काळ सही घेण्यात आल्याचे दावा देखील या प्रत्यक्षदर्शीने केलाय.