Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना कधीच मिळणार नाही १५०० रुपये; तुमचंही नाव आहे का? असं करा चेक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ एप्रिल ।। महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राबवली आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीसाठी टर्निंग पॉइंट ठरली.या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मार्च महिन्यापर्यंतचे हप्ते महिलांना देण्यात आले आहेत. दरम्यान आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना २-३ महिन्यांपासून पैसे आले नाहीत. याचाच अर्थ असा की या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेत निकषांबाहेर जाऊन ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.त्यामुळे त्यांना यापुढे कधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय? (Ladki Bahin Yojana Eligibility)
लाडकी बहीण योजनेत अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. महिला ही सरकारी कर्मचारी नसावी.महिलांकडे चारचाकी वाहन नसावे. या नियमांमध्ये बसत असणाऱ्याच महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. ज्या महिला या नियमांत बसत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

तुम्हाला पैसे येणार नाही हे कसं ओळखावं?
लाडकी बहीण योजनेतून ९ लाख महिला अपात्र झाल्या आहेत. काही महिलांनी स्वतः हून नावे मागे घेतली आहेत. या महिलांना गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे येत नाही. जर तुम्हालाही पैसे येत नसतील तर तुमचा अर्ज बाद झाला असेल. त्यामुळे तुम्हाला यापुढेही कधीच पैसे येणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *