महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ एप्रिल ।। आजच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरेच नव्हे तर गावांमध्येही लोक क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. खरेदी करताना लोक अनेकदा ईएमआयचा पर्याय निवडतात, परंतु यामागील धोके आणि फायदे समजून घेणे आवश्यक आहे.
क्रेडिट कार्ड ही एक प्रकारची बँकेद्वारे दिली जाणारी सुविधा आहे, जिच्याद्वारे तुम्ही आज खरेदी करू शकता आणि नंतर पैसे भरू शकता. हे एक “उधार” स्वरूपाचे कार्ड आहे, जे तुम्हाला काही मर्यादित रकमेपर्यंत खर्च करण्याची मुभा देते.
क्रेडिट कार्ड ईएमआयचे तोटे:
क्रेडिट कार्डवर ईएमआयवर खरेदी करताना लोक एका महिन्याचा हप्त्या पाहून वस्तू घेतात. मात्र, अशा अनेक खरेदीमुळे मासिक वेतनाचा मोठा भाग हप्त्यांमध्ये खर्च होतो आणि कर्जाचे जाळे निर्माण होते.
क्रेडिट कार्डवर विविध ऑफर्स आणि सवलती मिळतात, पण या ऑफर्समुळेच अनेकदा लोक गरजेपेक्षा जास्त खर्च करतात. ईएमआयमुळे सुरुवातीला कमी बोझा वाटतो, पण एकत्रितपणे मोठा आर्थिक भार निर्माण होतो.
जास्त खर्च होण्याची शक्यता – खिशात पैसे नसतानाही खर्च होतो.
उच्च व्याजदर – वेळेवर भरणा न केल्यास मोठे व्याज भरावे लागते.
कर्जाचा जाळा – अनेकदा लोक एकापेक्षा जास्त कार्ड वापरून कर्जात अडकतात.
लेट पेमेंट शुल्क – बिल वेळेत न भरल्यास दंड भरावा लागतो.
क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो – चुकीच्या वापरामुळे भविष्यकाळात कर्ज मिळण्यात अडचणी
क्रेडिट कार्ड ईएमआयचे फायदे:
मोठ्या खर्चाचे विभाजन छोटे हप्त्यांमध्ये केल्यामुळे मासिक नियोजन सुलभ होते.
ईएमआयवरील व्याजदर हे थकबाकीवरील व्याजापेक्षा कमी असतात.
नियमित हप्ता भरल्यास क्रेडिट स्कोअर चांगला राहतो.
अचानक मोठा खर्च टाळता येतो.
तत्काळ खरेदीची सुविधा – तुमच्याकडे पैसे नसले तरी खरेदी शक्य होते.
कॅशबॅक/रिवॉर्ड पॉइंट्स – खरेदीवर आकर्षक सवलती आणि पॉइंट्स.
EMI पर्याय – मोठ्या खरेदीसाठी हप्त्यांमध्ये पैसे फेडण्याची सुविधा.
ऑनलाईन व्यवहार सुलभ – नेट बँकिंग किंवा यूपीआयशिवाय सहज व्यवहार.
सावधगिरीची गरज:
ईएमआयची सुविधा वापरताना आपण खरेच त्या वस्तूची गरज आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. फसव्या ऑफर्स किंवा आकर्षक सवलतींमुळे आर्थिक नियोजन बिघडू शकते. त्यामुळे क्रेडिट कार्ड ईएमआयचा वापर विचारपूर्वक करा.
क्रेडिट कार्ड वापरताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी
केवळ गरजेपुरताच वापर करा.
प्रत्येक महिन्याचे बिल वेळेत भरा.
पूर्ण पेमेंट करा, फक्त मिनिमम अमाउंट भरू नका.
क्रेडिट लिमिटपेक्षा जास्त खर्च करू नका.
कार्ड गहाळ झाल्यास तात्काळ कस्टमर केअरला कळवा.