Jammu-Kashmir Loc Firing: ऑपरेशन सिंदूरने पाकडे भेदरले, LoC वर अंदाधुंद फायरिंग : सैन्याचे चोख प्रत्युत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन -दि.7 मे – भारताने पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर देत Operation Sindoor अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तान आता अस्वस्थ झाला आहे आणि त्याने पुन्हा एकदा भारतीयांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १३-१४ दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत सिझफायरचं उल्लंघन केलं जात आहे. तर, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा Loc Firing केला. या गोळीबारात ३ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

सध्याची परिस्थिती पाहता, जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आज बंद राहतील, असे आदेश जारी करण्यात आले आहेत, तशी माहिती जम्मूच्या विभागीय आयुक्तांनी दिली.

भारताने पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर रावबलं. या कारवाईने भेदरलेल्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा गोळीबार केला. 7 मे च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने LOC वर सीमा ओलांडून अंदाधुंद गोळीबार केला. या अंदाधुंद गोळीबारात तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशापासूनच पाकिस्तान सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे, याला भारताकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली होती. यासोबतच, भारत पाकिस्तानच्या कृतींना प्रत्युत्तर देईल आणि दहशतवादाविरुद्ध कारवाई करेल, असंही सांगितलं होतं. 22 एप्रिलला काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने 7 मे 1:30 वाजता पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात पाकिस्तानच्या 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जे दहशतवाद्यांचे गढ होते. भारतीय सेनेने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *