Operation Sindoor Update : आणखी मोठं काहीतरी घडण्याचे संकेत : जवानांच्या सुट्ट्या रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ मे ।। भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर’नंतर दिल्ली, पाटणासह अनेक महत्त्वाच्या विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता देशभरातील तब्बल 18 विमानतळावरची उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पण प्रशासनाने सर्व प्रवाशांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे लेह आणि लडाख येथील ऑल लडाख हॉटेल अँड गेस्टहाऊस असोसिएशनने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विमानसेवा पूर्ववत होत नाही तोपर्यंत पर्यटकांना हॉटेल्समध्ये राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे.

भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ केल्यानंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा युरोप दौरा रद्द केला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (POK) अनेक दहशतवादी ठिकाण्यांवर हल्ला केला. भारताने पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी ठिकाणांच्या 21 कॅम्पवर मिसाइलने हल्ला केला. या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचा युरोपातील तीन देशांचा दौरा रद्द केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता काय होणार?, अशा चर्चा सुरू आहेत. या सगळ्या घाडमोडींदरम्यान केंद्र सरकारने देशातील 18 विमानतळांवरील उड्डाणे 10 मे पर्यंत रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर घडत असलेल्या या घडामोडी आगामी काळातील नव्या घटनांचे संकेत देत असल्याची चर्चा आहे.

दिल्ली विमानतळावरून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर अनेक परदेशी आणि देशांतर्गत विमान कंपन्यांनी दिल्लीहून ये-जा करणारी सुमारे 35 विमाने रद्द केली आहेत. यात दिल्लीहून जाणारी 23 देशांतर्गत विमाने आणि दिल्लीला येणारी 8 विमाने यांचा समावेश आहे. याशिवाय, रात्री 12 नंतरची 4 आंतरराष्ट्रीय विमाने देखील रद्द करण्यात आली. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘अमेरिकन एअरलाइन्स’सारख्या परदेशी विमान कंपन्यांनी दिल्ली विमानतळावरून काही विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. येथून दररोज सुमारे 1,300 विमानांची ये-जा असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *