Operation Sindoor: भारतीय लष्कराची धडाकेबाज कामगिरी ; पाकिस्तानचे ५० हून अधिक ड्रोन नेस्तनाबूत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ मे ।। Operation Sindoor Updates: पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि दहशतवादी संघटनांचे नऊ अड्डे नष्ट केले. ६-७ मे च्या रात्री भारतीय सैन्याच्या यशानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने ७-८ मे आणि ८-९ मे च्या रात्री भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केले.

पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र विमानांनी जम्मू काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंतच्या शहरांमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे धाडस केले परंतु त्यापैकी कोणत्याही ठिकाणी त्यांना यश मिळाले नाही. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्या सर्वांना हाणून पाडले आहे. पाकिस्तानने संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे, ज्याला भारतीय सैन्य योग्य उत्तर देत आहे.

पाकिस्तानचे ५० ड्रोन नेस्तानाबूत
काल रात्री, पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विविध ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत एल-७० तोफा, झेयू-२३एमएम, शिल्का प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-यूएएस उपकरणांचा मोठ्या प्रमाणत वापर करण्यात आला. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *