Horoscope Today दि. १७ मे ; आज मनातील निराशा झटकून टाका.…..….…… ; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मे ।।

मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपल्याला आवडत्या गोष्टी करण्यावर अधिक लक्ष द्यावे. दिवस मनाप्रमाणे घालवावा. जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. गोड बोलून कामे साध्य करावीत.

वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
मनाची चंचलता जाणवेल. प्रगल्भ विचार मांडाल. सारासार विचार करण्यावर अधिक भर द्याल. उगाच चिडचिड करू नका. काम आणि वेळ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा.

मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
स्वत:ची आब राखून वागावे. फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
घाईघाईने कामे करणे टाळा. शांतपणे विचार करून पाऊल उचला. मनातील निराशा झटकून टाकावी. कामे यथायोग्य पार पडतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल.

सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
इतरांना आनंदाने मदत कराल. पारमार्थिक कामात सहभागी व्हाल. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. कामातील किरकोळ अडचणी दूर करता येतील. भागीदाराशी सामंजस्य ठेवावे

कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
अपचनाचा त्रास जाणवेल. हलका आहार घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. कामात हयगय करू नका. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा.

तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोक वेळेवर भेटतील. क्षुल्लक कारणाने चिडू नका. अचानक धनलाभ संभवतो. योग्य वेळेचा लाभ उठवावा.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. चर्चेने काही प्रश्न हाताळावेत. सबुरी व संयम दोन्ही जपावा लागेल. कामात मन रमवावे लागेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
आवडते खेळ खेळाल. मित्रांशी पैज लावाल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. काहीसे हट्टीपणे वागणे ठेवाल.

मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
संपूर्ण विचारांती शब्द द्यावा. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलू नका. उगाचच नसते विचार करत बसू नका. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. विचारांची दिशा

कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
नको तिथे उत्साह दाखवायला जाऊ नका. कृती करण्याआधी संपूर्ण विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. मानापमानाचे प्रसन्न फार मनावर घेऊ नका.

मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope)
आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. हस्त कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *