Economic Slowdown: भारतासाठी मोठी बातमी, अर्थव्यवस्थेला पंख फुटले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मे ।। जागतिक मोठ-मोठ्या अर्थव्यवस्थांना अलीकडच्या काही वर्षात अनेक आव्हानांना समोर जावे लागले आहे तर यादरम्यान भारताची इकॉनॉमी जागतिक पातळीवर सर्वात वेगाने अग्रेसर आहे. अलीकडेच जर्मनीला मागे टाकत भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आणि आता आपण चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.

सध्या फक्त जपान, चीन व अमेरिका भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुढे आहेत आणि यामध्येही जपानची स्थिती सतत बिकट होत चालली आहे. जपान सरकारने शुक्रवारी एक अहवाल प्रसिद्ध केला ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2025 च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक विकास दर 0.7% पर्यंत घसरला आहे तर, भारत सध्या 6 टक्क्यांहून अधिक वेगाने विकासाच्या दिशेने अग्रेसर आहे.

भारत आता लवकरच जपानच्या एक पाऊल पुढे
जपान सरकारच्या अलीकडेच जारी केलेल्या निवेदनानुसार, जानेवारी-मार्चमध्ये जपानचे वास्तविक GDP (किंवा देशाच्या वस्तू आणि सेवांचे मोजमाप) ऑक्टोबर-डिसेंबर 2024 (मागील तिमाही) च्या तुलनेत अपेक्षेपेक्षा जास्त, 0.2%, कमी झाले. गेल्या एका वर्षात प्रथमच त्यात आकुंचन नोंदवले गेले, म्हणजे जपानचा विकास दर शून्यापेक्षा कमी झाला आणि अर्थव्यवस्थेचा आकार वाढण्याऐवजी कमी होऊ लागला आहे.

कुठून कुठे पोहोचला जपान
अहवालानुसार, 2024 च्या शेवटच्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) जपानची अर्थव्यवस्था वार्षिक 2.4% दराने वाढीला. निर्यातीत 2.3% घट दिसून येत आहे तर, ग्राहक खर्च स्थिर राहिला आणि भांडवली गुंतवणूक 5.8% वाढली. त्याचप्रमाणे, याआधी जानेवारी-मार्च 2024 च्या तिमाहीत जपानची अर्थव्यवस्था देखील शून्य ते उणे 0.४4 टक्क्यांपर्यंत घसरली होती. अशाप्रकारे, वार्षिक आधारावर जपानची अर्थव्यवस्था सध्या उणे 0.7% दराने कमी होत आहे.

मंदीच्या दिशेने जपानची चाल
जपानवरील संकट अद्याप इथेच संपले नाही तर पुढे आणखी आव्हाने आहेत. खरं तर, अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे (टॅरिफ) जपानच्या प्रमुख निर्यातदारांना, विशेषतः मोटार वाहन उत्पादकांच्या, केवळ जपानमधून पाठवल्या जाणाऱ्या उत्पादनांसाठीच नाही तर मेक्सिको आणि कॅनडासारख्या इतर देशांमधून देखील, अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत त्यांची भूमिका बदलत असल्याने प्रतिसादाचे नियोजन करणे देखील एक आव्हान असल्याचे जपानी अधिकाऱ्यांनी मान्य केले. अशा परिस्थितीत जपानला कोणताही प्रस्ताव देणे खूप कठीण आहे. टॅरिफचा परिणाम दिसून आला तर, 2025 च्या दुसऱ्या तिमाहीतही जपानचा विकास दर शून्यापेक्षा कमी अपेक्षित आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्था तांत्रिकदृष्ट्या मंदीत प्रवेश करेल.

भारत आणि जपानी अर्थव्यवस्था
2025 मध्ये जपानचा जीडीपी 4.39 ट्रिलियन डॉलर्स असण्याचा अंदाज असून या काळात जपानची क्रयशक्ती 6.77 ट्रिलियन डॉलर्स राहण्याचा अंदाज आहे. अशाप्रकारे, जपान अजूनही चौथी अर्थव्यवस्था आहे. दुसरीकडे, भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 4.3 ट्रिलियन डॉलर्स असून विविध रेटिंग एजन्सींनी भारत दर दीड वर्षांनी आपल्या अर्थव्यवस्थेत 1 ट्रिलियन डॉलर्सची भर घालण्याचा अंदाज वर्तवला आहे.

अशाप्रकारे, पुढील 2 ते 3 महिन्यांतच भारतीय अर्थव्यवस्था जपानच्या एक पाऊल पुढे जाईल. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सध्या सुमारे 6.5% आहे तर, जपान शून्याच्या खाली गेला आहे. त्यामुळे, भारत लवकरच त्याला मागे टाकेल आणि चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *