महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मे ।। पुणेकरांनो जर तुम्ही वाहतुकीचे नियम मोडत असाल तर ही बातमी एकदा बघाच. कारण वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता एआय कॅमेरा तुमच्यावर नजर ठेवतोय. पुण्यातील एफ सी रोडवर नव्याने उभारण्यात आलेले ए आय इंटिग्रेटेड कॅमेरे बसवले आहेत. वाहतूक नियम मोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कॅमेऱ्याच्या माध्यमातून फेस रिकग्नायझेशन देखील होईल म्हणजेच सीसीटीव्हीत येणार्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा या यंत्रणेच्या माध्यमातून ’कॅप्चर’ होईल.
त्यानंतर पुणे पोलिसांकडे असलेल्या माहितीच्या आधारे त्या वाहनावर दंडात्मक कारवाई होणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास तुम्हाला किती दंड बसला आहे याचा मेसेज तुमच्या खात्यावर पडणार आहे. अनेक टवाळखोर हे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत ट्रीपलसीट फिरत असतात. तसेच सिग्नल देखील तोडत असतात. त्यामुळे आता या नवीन यंत्रणेमुळे नियम मोडणाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार आहे.