![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ जून ।। प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. निवृत्तीनंतर तुम्हाला भविष्यात कधीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी आतापासूनच तरतूद करायला हवी. यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. स्टेट बँकेने एसआयपी स्कीम सुरु केली आहे. या योजनेत तुम्ही फक्त २५० रुपये गुंतवून १७ लाख रुपये कमवू शकतात. जर तुम्ही जास्त वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला ७८ लाख रुपयेदेखील मिळतील.
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एसबीआय म्युच्युअल फंड यांनी मिळून जननिवेश एसआयपी सुरु केली आहे. जननिवेश एसआयपी ही ग्रामीण, निम शहरी आणि शहरी भागांमधील लोकांसाठी राबवण्यात आली आहे.या योजनेत तुम्ही फक्त २५० रुपये दर महिन्याला जमा करुन १७ लाख रुपये मिळवू शकतात.या योजनेत तुम्ही रोज, आठवड्याला किंवा महिन्याला गुंतवणूक करु शकतात.
गुंतवणूकीसाठी बेस्ट पर्याय
एसबीआयच्या या एसआयपी स्कीममध्ये गुंतवणूकदार सुरुवातीला बॅलन्सड अॅडव्हांटेज फंडमध्ये गुंतवणूक करु शकतात. या फंडमध्ये इक्विटी आणि कर्ज यामध्ये गुंतवणूक करतात.
१७ लाख रुपये मिळवा
एसबीआयच्या एसआयपी स्कीममध्ये २५० रुपये गुंतवून तुम्ही १७ लाख रुपये मिळवू शकतात. ही एसआयपी एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. एसआयपीमध्ये तुम्हाला १२ ते १६ टक्के रिटर्न मिळवू शकतात. यामध्ये तुम्ही २५० रुपये महिन्याला गुंतवणूक केली आणि ही एसआयपी ३० वर्षांसाठी ठेवली तर तुम्हाला १५ टक्के रिटर्न मिळेल. म्हणजेच तुम्हाला १७.३० लाख रुपये मिळणार आहेत. यातील ९०,००० रुपये तुम्ही जमा केले होते. त्यावर १६,६२,४५५ रुपये परतावा मिळतो.
जर तुम्ही या योजनेत ४० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही ७८ कोटी रुपये मिळवू शकतात. या योजनेत जर तुम्ही ४ वर्षांसाठी दर महिन्याला ७८ लाख रुपये जमा केले तर त्यावर १५ टक्के रिटर्न मिळेल. यात तुम्ही १.२० लाख रुपये गुंतवलेले असणार. त्यावर व्याज आणि चक्रव्याढ व्याज मिळून ७८.५०,९३९ रुपये मिळणार आहेत.
