Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
या वेगवान गोलंदाजांचे ... 500 हून अधिक महिलांसोबत संबंध... ; स्वतःच केला विचित्र खुलासा - Maharashtra 24

या वेगवान गोलंदाजांचे … 500 हून अधिक महिलांसोबत संबंध… ; स्वतःच केला विचित्र खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जून ।। वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज टिनो बेस्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो क्रिकेटमुळे नाही, तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे फारच चर्चेत आला आहे. आपल्या आत्मचरित्रात त्याने केलेल्या धक्कादायक खुलासे केले आहेत. यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. क्रिकेटमध्ये फारशी छान कामगिरी न करता आलेला टिनो बेस्टने हे खुलासे केले आहेत. टिनो नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे.

500 हून अधिक महिलांसोबत संबंध
टिनो बेस्टने आपल्या आत्मचरित्रात दावा केला आहे की, त्याने आतापर्यंत 500 ते 650 महिलांसोबत शरीरसंबंध ठेवले आहेत. त्याने लिहिलंय की, “माझी कमकुवत बाजू म्हणजे मुली. मला मुली खूप आवडतात. मला वाटतं की मी जगातला सर्वात सुंदर टकलू माणूस आहे आणि मी ‘ब्लॅक ब्रॅड पिट’ आहे.”

क्रिकेट करिअर न्हवते उत्तम
बेस्टचा क्रिकेट प्रवास फारसा गाजला नाही. त्याने वेस्ट इंडीजसाठी 25 टेस्ट, 26 वनडे आणि 6 टी-20 सामने खेळले. टेस्टमध्ये 56, वनडेमध्ये 34 तर टी-20 मध्ये 6 विकेट्स घेतल्या. बॅटने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 500 हून अधिक धावा केल्या. त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. मात्र, कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये 13 सामन्यांत 12 विकेट्स घेतल्या.

ब्रेकअपनंतर बदललो…
आपल्या पहिल्या गर्लफ्रेंडसोबत मेलिसासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आपलं वागणं पूर्णपणे बदलल्याचं त्याने कबूल केलं आहे. मेलिसाकडून तिला तामानी ही मुलगी आहे. तो म्हणतो, “ब्रेकअपनंतर मी पूर्णपणे मुलींचा दिवाणा झालो. मला एखादी मुलगी आवडली, की मी तिला भेटायचो, बोलायचो आणि नंतर गोष्टी पुढे जायच्या.”

ऑस्ट्रेलियन मुली सुंदर आणि फिट…
टिनोच्या मते, जगात सगळ्यात सुंदर आणि फिट मुली ऑस्ट्रेलियामध्ये असतात. “त्या खूपच आकर्षक असतात आणि आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात,” असंही त्याने आत्मचरित्रात नमूद केलं.

क्रिकेटच्या करियर परिणाम खासगी आयुष्यावर नाही
इतकं सगळं असूनही या खासगी आयुष्याचा त्याच्या मैदानावरील प्रदर्शनावर कधीही परिणाम झाला नाही, असं टिनोचं म्हणणं आहे. “मी मैदानात माझ्या 100 टक्के क्षमतेनं खेळायचो,” असं त्याचं स्पष्ट मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *