Gold Price: युद्धाचा भडका, सोन्यात दरवाढीचा तडका ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जून ।। सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, १६ जून २०२५ रोजी, सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे खरेदीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १६ जून २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १००,४४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९२,०७० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १०६,९५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,०६९ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९१,८९६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १००,२५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,८९६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १००,२५० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,८९६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १००,२५० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९१,८९६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १००,२५० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *