महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जून ।। Iran Israel War अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रविराम झाल्याची घोषणा केली. दोन्ही देशांशी चर्चा केली आणि दोन्ही देशांनी यासाठी सहमती दर्शवली असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा दावाफेटाळण्यात आला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रविराम झाल्याचा दावा फेटाळला. सध्या असा कोणताही करार झालेला नाही, असे अराघची यांनी म्हटले आहे. दरम्यान इराणचे सर्वोच्च अयातुल्ला खामेनी यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
काय आहे खामेनी यांची पोस्ट?
“इराणची जनता आणि इराणचा इतिहास ज्यांना ठाऊक आहे त्यांना हे देखील ठाऊक आहे की इराण कधीही शरणागती पत्करत नाही. शरणागती पत्करणं हा आमच्या देशाचा स्वभावच नाही.” अशी पोस्ट खामेनी यांनी केली आहे.
Those who know the Iranian people and their history know that the Iranian nation isn’t a nation that surrenders.
— Khamenei.ir (@khamenei_ir) June 23, 2025
सय्यद अब्बास अरघाची यांची पोस्ट काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविराम झाल्याची पोस्ट केल्यानंतर खामेनी यांनी केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे. दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अराघाची यांनीही शस्त्रविराम झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघाची यांनी धक्कादायक विधान करत या बाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, इस्रायलला त्याच्या कृत्यांसाठी शिक्षा देण्यासाठी आमच्या सशस्त्र दलांची लष्करी कारवाई पहाटे चार वाजेपर्यंत सुरू राहिली. आपल्या प्रिय देशाचे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रक्षण करण्यास तयार असलेल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या आपल्या शूर सशस्त्र दलांचे आभार मानण्यासाठी मी सर्व इराणी नागरिकांसोबत सामील आहे. असेही ते म्हणाले.
ट्रम्प यांच्या शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर काय आहे इराणमधली स्थिती?
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा केल्यानंतर इराणमध्ये अनेक शहरांमध्ये स्फोटांचे मोठे आवाज येत असल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं असून त्यानंतर इराणनं तेहरानमधील हवाई तळावरील कारवाया वाढवल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा केल्यानंतरदेखील इस्रायल व इराणकडून अद्याप युद्धबंदीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. उलट इस्रायलयनं तेहरानमधील आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे व शहर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. याआधी इस्रायलनं मेहरान व डिस्ट्रिक सहा या शहरांमधील नागरिकांना शहर सोडून जाण्याचं आवाहन केलं होतं.