![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। मागील काही वर्षांपासून रेल्वेची दरवाढ झाली नव्हती. आता मात्र, 1 जुलैपासून रेल्वेच्या तिकिट दरात आता वाढ होणार आहे. मात्र, ही दरवाढ काही श्रेणींसाठी लागू होणार असून किमान दरवाढ ही एक पैसा प्रति किलोमीटर इतकी आहे.
रेल्वे मंत्रालय 1 जुलै 2025 पासून नवीन भाडे रचना लागू करण्याच्या तयारीत असून, यामध्ये दूर अंतराच्या प्रवासासाठी किरकोळ वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून रेल्वेच्या तिकिट दरात थेटपणे वाढ करण्यात आली नव्हती. देशातील गरीब, मध्यमवर्गीय असलेल्या कोट्यवधी प्रवाशांसाठी रेल्वेचा प्रवास हा अतिशय परवडणारा आहे. तर, भारतात रेल्वेचा प्रवास हा अतिशय स्वस्त समजला जातो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगरीय लोकल गाड्यांच्या भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही. तसेच, मासिक सीझन तिकीट (MST) देखील मागील दरांवरच उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे मुंबई, कोलकाता, चेन्नई यांसारख्या शहरांत लोकलने प्रवास करणाऱ्या कोटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
