कामाची बातमी : EPFO : पीएफ खात्यातून आता 5 लाखांपर्यंत रक्कम मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांसाठी एक दिलासादायक घोषणा केली आहे. ईपीएफओने आगाऊ रकमेसाठी (अ‍ॅडव्हान्स क्लेम) ऑटो सेटलमेंटची मर्यादा एक लाख रुपयांवरून थेट पाच लाख रुपये केली आहे. या निर्णयामुळे पीएफ खातेदारांच्या आकस्मिक आर्थिक गरजेच्या वेळी पीएफ खात्यातून पैसे तत्काळ काढता येणार आहेत. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो पीएफधारकांना दिलासा मिळाला आहे.


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांना कोणत्याही थर्ड पार्टी एजंटची मदत घेण्याबाबत सावध केले आहे. पीएफ खात्याशी संबंधित सेवांसाठी अधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून महत्त्वाच्या माहितीच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही. अनेक सायबर कॅफे चालक किंवा फिनटेक कंपन्या ईपीएफओ सदस्यांकडून त्या सेवांसाठी मोठी रक्कम आकारत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अधिकृतपणे विनामूल्य आहेत. या बाहेरील संस्था ईपीएफओद्वारे अधिकृत नाहीत, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

एप्रिल 2025 मध्ये 19.14 लाख नवीन सदस्य जोडले गेले
कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ईपीएफओने एप्रिल 2025 मध्ये निव्वळ 19.14 लाख सदस्य जोडले आहेत. हा आकडा मार्च 2025 च्या तुलनेत 31.31 टक्के आणि एप्रिल 2024 च्या तुलनेत 1.17 टक्क्याने अधिक आहे. ईपीएफओने एप्रिल 2025 मध्ये सुमारे 8.49 लाख नवीन सदस्यांची नोंदणी केली, जी मार्च 2025 च्या तुलनेत 12.49 टक्के वाढ दर्शवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *