महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। पेटीएम युजर्ससाठी खुशखबर हाती आली आहे. ज्या युजर्सने त्याची सर्व बँक खाती यूपीआयसाठी संलग्न केली आहेत. त्या युजर्सला एकत्रितपणे सर्व खात्यांची एकूण शिल्लक एका ठिकाणी पाहण्याची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा युजर्सला आर्थिक नियोजन अधिक सुलभतेने करता येणार आहे. तसेच प्रत्येक खात्याचे वेगवेगळे शिल्लक तपशीलही पाहता येणार आहे.
आधी प्रत्येक खात्याची शिल्लक स्वतंत्रपणे तपासावी लागायची. तसेच एकूण रक्कम मोजावी लागायची. आता पेटीएमच्या नवीन सुविधेमुळे सुरक्षितपणे प्रत्येक खात्याची शिल्लक गोपनीय संकेत क्रमांकाद्वारे तपासता येणार आहे. सर्व बँक खात्यातील एकूण शिल्लक रक्कम एकत्रितपणे पाहायला मिळणार आहे. यामुळे बचत, खर्च किंवा पगाराचं व्यवस्थापन करता येईल. त्यामुळे संपूर्ण आर्थिक स्थितीचा मागोवा ठेवणे सोपे जाईल.
पेटीएमचे प्रतिनिधी म्हणाले की, ‘आम्ही सातत्याने नाविन्यपूर्ण उपाययोजना करून आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. नव्या सुविधेमुळे आता सर्व खात्यांची एकत्र माहिती मिळेल, यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. तसेच बचत नियोजन करणे आणि योग्य आर्थिक निर्णय घेणे अधिक सोयीचे होईल’.
कंपनीने मोबाइल व्यवहार अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी अनेक नवीन तांत्रिक सुविधा दिल्या आहेत. यामध्ये खास व्यवहार लपवण्याची किंवा उघड करण्याची सोय असणार आहे. जलद व्यवहारासाठीची मुख्य पडद्यावरील साधने, सहज लक्षात राहतील आणि वैयक्तिक ठरतील अशा ओळखी तयार करण्यासाठी स्वतंत्र यूपीआय ओळख योजना आणि पीडीएफ स्वरूपात व्यवहाराचा अहवाल डाऊनलोड करण्याची सुविधा यांचा समावेश आहे.
पेटीएम आता संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस, भूतान, श्रीलंका आणि नेपाळ या देशांमध्ये यूपीआय व्यवहार चालू करत आहे. यामुळे परदेश प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी व्यवहार अधिक सुलभ झाले आहेत.
..
सर्व यूपीआय संलग्न बँक खात्यांची एकूण शिल्लक पाहण्यासाठी प्रक्रिया कशा आहे?
पेटीएम अॅप उघडा आणि शिल्लक आणि हिस्ट्री विभागात जा
खाते अद्याप संलग्न केले नसेल तर यूपीआयशी बँक खाते जोडा
संलग्न केल्यानंतर प्रत्येक खात्याची शिल्लक एक एक करून गोपनीय संकेत क्रमांक टाकून तपासा
जेव्हा कोणत्याही खात्याची शिल्लक तपासली जाईल, तेव्हा सर्व खात्यांची एकूण शिल्लक वरच्या भागात आपोआप दाखवली जाईल.